Tag Archives: amit shah

उद्धव ठाकरे यांचे आव्हान, बंद दाराआडचे धंदे बंद करा…मैदानात या अमित शाह यांच्यावर साधला निधाणा

चार दिवसांपूर्वी राज्यात बाहेरचे बाजारबुणगे महाराष्ट्रात आले होते. बंद दाराआड बोलताना मला आणि शरद पवार यांना संपविण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दाराआडचे धंदे बंद करावे आणि हिंमत असेल तर मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करावी असे आव्हान शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिले. जर …

Read More »

अमित शाह यांचा सवाल, राहुल गांधी तुम्हाला एमएसपीचा लाँगफॉर्म माहित आहे का? अग्निपथ योजनेतील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही

हरियाणा विधानसभा निवडणूकीतील लढाई आता चांगलीच रंगत येत चालली आहे. या लढाईत राहुल गांधी यांनी हरियाणातील तरूण अवैध मार्गाने अमेरिकेत जात असल्याचा आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे भाजपाची पुरती पंचायत झाल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत… 'शाहना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'

शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप जंयत पाटील यांनी सरकारवर केला. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह बरोबर डर्टी डजन मधील एकाला पाहिले देश बंदुकीवर नाही संविधानावर चालतो हे सरकार मराठी माणसांच्या विरोधातलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलवून नागरिकांना त्रास होईल, असे प्रशासनाने काही करु नये कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्धघाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलवले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, महायुतीच्या विजयासाठी भाजपा संघटना सज्ज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पक्ष संघटनेत चैतन्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या महाराष्ट्र दौर्‍यात पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमाने काम करेल, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. प्रदेश समन्वयक …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, बाजार बुनग्यांना महाराष्ट्र पायाखाली आणायचाय भाजपा नेते अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अमित शाह यांना ‘बाजरबुंगे’ अशा शब्दात टीका केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शाह यांना महाराष्ट्राला पायाखाली आणायचे आहे, पण महाराष्ट्र ही महान लोकांची भूमी असल्याची आठवणही यावेळी करून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या …

Read More »

अमित शाह यांचा राहुल गांधी सुशीलकुमार शिंदेंना टोला, या लाल चौकात खुशाल फिरा एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित जे तुमच्या काळात नव्हते

जम्मू आणि काश्मीरातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथील बर्फाळ प्रदेशातही राजकिय वातावरण चांगलेच तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयस्क्रिम खात गाडीवरून फिरत प्रवास केल्याचे दृष्य पाह्यला मिळाले. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना जम्मू आणि काश्मीरात …

Read More »

पोर्ट ब्लेअरचे आता श्री विजय पुरम नामकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत दिली माहिती

अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे आता श्री विजय पुरम असे नामकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर ट्विट करत जाहिर केले. तसेच स्पष्ट केले की, देशाला वसाहतवादी जोखडातून मुक्त आणि वसाहतवादीचा गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त झाल्याचे दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टीकोन साकार करण्यासाठी म्हणून …

Read More »

राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर… नाना पटोले यांचा इशारा तरविंदरसिंह मारवाच्या विधानावर मोदी, शाह व भाजपाने भूमिका स्पष्ट करावी

दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. मारवा यांचे विधान हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे. भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी आहे म्हणूनच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत …

Read More »

अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे …

Read More »