भाजपाकडून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातही हरियाणा पॅटर्नः दिवाळीनंतर जाहिर सभा राज्यात महायुतीच्या पुनरागमनासाठी १०० हून अधिक भाजपा नेत्यांची रॅली

नुकतेच हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोजक्याच जाहिर सभा घेतल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या चेहऱ्यामुळे भाजपाच्या ४०० जागांचा नारा उलटला. त्या धर्तीवर हरियाणा विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा कमी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या रणनीतीचा एक भाग म्हणून १०० हून अधिक नेते उमेदवारी अर्ज भरून प्रचारात उतरले, तसेच दिवाळीच्या सणानंतर भाजपा आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशभरातील भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबरपासून पंतप्रधान मोदींच्या एकूण ११ ते १२ जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या १५ ते २० सभा होणार आहेत. तर योगी आदित्यनाथ आणि अन्य वरिष्ठ नेत्यांसह भाजपाने १०० हून अधिक सभांचे नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण ११ ते १२ सभा घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यावर मोठी जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. त्या दरम्यान ते महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या सभा केवळ भाजपाच्याच नसून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही असतील. या सर्व बैठकांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रातही १५ सभा घेणार आहेत. याशिवाय गोवा, मध्य प्रदेश आणि हरियाणाचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांची संभाव्य भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी – ११ ते १२ जाहिर सभा
अमित शाह – २० जाहिर सभा
नितीन गडकरी- २० ते २२ जाहिर सभा
देवेंद्र फडणवीस- ​​५० जाहिर सभा
चंद्रशेखर बावनकुळे – ४० जाहिर सभा
योगी आदित्यनाथ- १५ जाहिर सभा

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *