Tag Archives: amit shah

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, महायुतीच्या विजयासाठी भाजपा संघटना सज्ज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पक्ष संघटनेत चैतन्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या महाराष्ट्र दौर्‍यात पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमाने काम करेल, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. प्रदेश समन्वयक …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, बाजार बुनग्यांना महाराष्ट्र पायाखाली आणायचाय भाजपा नेते अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अमित शाह यांना ‘बाजरबुंगे’ अशा शब्दात टीका केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शाह यांना महाराष्ट्राला पायाखाली आणायचे आहे, पण महाराष्ट्र ही महान लोकांची भूमी असल्याची आठवणही यावेळी करून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या …

Read More »

अमित शाह यांचा राहुल गांधी सुशीलकुमार शिंदेंना टोला, या लाल चौकात खुशाल फिरा एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित जे तुमच्या काळात नव्हते

जम्मू आणि काश्मीरातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथील बर्फाळ प्रदेशातही राजकिय वातावरण चांगलेच तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयस्क्रिम खात गाडीवरून फिरत प्रवास केल्याचे दृष्य पाह्यला मिळाले. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना जम्मू आणि काश्मीरात …

Read More »

पोर्ट ब्लेअरचे आता श्री विजय पुरम नामकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत दिली माहिती

अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे आता श्री विजय पुरम असे नामकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर ट्विट करत जाहिर केले. तसेच स्पष्ट केले की, देशाला वसाहतवादी जोखडातून मुक्त आणि वसाहतवादीचा गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त झाल्याचे दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टीकोन साकार करण्यासाठी म्हणून …

Read More »

राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर… नाना पटोले यांचा इशारा तरविंदरसिंह मारवाच्या विधानावर मोदी, शाह व भाजपाने भूमिका स्पष्ट करावी

दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. मारवा यांचे विधान हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे. भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी आहे म्हणूनच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत …

Read More »

अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, उबाठाने….माफी मागावी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून शेलार यांची मागणी

उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि बाप्पाची ताटातूट केलीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गणेशभक्त आणि लालबागच्या राजाची पायावर नाक घासून माफी मागावी, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, आता लालबागचा राजा ही… अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून साधला निशाणा

सध्या राज्यासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सवाची धाम धुम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते महायुतीच्या नेत्यांची एक बैठक घेणार असून लालबागच्या राज्याचे दर्शनही घेणार आहेत. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर खोचक …

Read More »

अमित शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांचा तिरंग्याखाली निवडणूका जम्मू काश्मीरला तीन कुटुंबानी लुटले

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांमधील सामन्यातील रंगत वाढत चाचली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या फारूख अब्दुला यांच्या नॅशनल काँन्फरन्सच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यासभेत बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देणार असल्याचे आश्वासन …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, प्रशासनात लॅटरल एन्ट्री…आरक्षण धोक्यात धर्म नाही, तर आरक्षण धोक्यात

मी आधीही म्हणालो होतो, आज पुन्हा सांगतोय धर्म संकटात नाहीय, आरक्षण संकटात आहे. एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे हे भाजपाचे मॉडेल आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा-आरएसएस बाबासाहेबांचे कार्य …

Read More »