Tag Archives: ashok chavan

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा …

Read More »

बैठक तर झाली पण आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती तोडगा लवकरच निघेल अशी काँग्रेस नेत्यांना आशा

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचे खाती नाही. तसेच निर्णय प्रक्रियेत स्थान नसल्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत असलेली नाराजी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नेत्यांचे म्हणणे ऐकत यासंबधीचा निर्णय नंतर कळविणार असल्याचे …

Read More »

महिला, मधुमेह, हार्टचे पेशंट, श्वसन विकारग्रस्तांना शासकिय कार्यालयात बोलावू नका सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व प्रशासनाला आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी मधुमेह, हार्टचे पेशंट आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये बोलाविण्याऐवजी त्यांना घरूनच काम करण्याचे आदेश द्यावेत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या प्रशासनाला दिली. याबरोबरच महिला या कुटुंबातील प्रमुख असतात त्यामुळे या महिलांनाही कार्यालयात …

Read More »

कोरोना पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पंतप्रधानांनी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १० टक्के म्हणजे तब्बल २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा …

Read More »

पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी? मंत्री अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारचे पॅकेज कोरोनामुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी आहे की धनदांडग्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोरोना पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकारने नवीन आर्थिक धोरणे जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी …

Read More »

९ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज दाखल : पण निवडणूक बिनविरोध होणार खबरदारी म्हणून भाजपा, राष्ट्रवादीकडून प्रत्येकी २ जणांचे जास्तीचे अर्ज : १ अपक्ष रिंगणात

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. या निवडणूकीत जरी १४ उमेदवारांनी आपले अर्ज भरले तरी यापैकी भाजपा आणि …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंसाठी काँग्रेसची माघार: मात्र राष्ट्रवादीसमोर लीन ९ वा उमेदवार मागे

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडूण येण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणूकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधान परिषदेची जास्तीची एक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु राष्ट्रवादीने त्यांच्या हिश्यातील दुसरी …

Read More »

अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या तज्ञगटाच्या अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञगटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ञाच्या या अहवालात सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज विचारविमर्श करण्यात आला. उपसमिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचना, शिफारशींसह हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी …

Read More »

काँग्रेस मंत्र्यांचा निर्णय, अडकलेल्या मजूरांचा प्रवास खर्च उचलणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांचा प्रवास खर्चाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात अडकून पडलेल्या सर्व स्थलांतरित मजूरांच्या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उचलणार आहे. यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरु करून मजूरांची माहिती घेतली जाणार आहे व जिल्हाधिकारी व रेल्वे अधिका-यांना पत्र लिहून आवश्यक तो निधी …

Read More »

ग्रीन झोनमधल्या नांदेडमध्येही आता कोरोना जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात!: पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या अचानक २६ झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भयभीत न होता अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. गेल्या आठवड्यापर्यंत नांदेडमध्ये एकही रूग्ण नव्हता आणि आज ही संख्या २३ ने वाढून २६ वर गेली. नांदेडमधील जुन्या ३ रूग्णांपैकी १ …

Read More »