साडे पाच लाख दूध उत्पादकांचा कौल डावलून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा हक्क देऊन मागील दाराने गोकुळवर कब्जा मिळवणाऱ्या महायुती सरकारविरोधात तसेच लोकशाही आणि सहकार टिकवण्यासाठी काढलेल्या कोल्हापूरचा संघर्ष मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपण लढलो की जिंकतो आणि त्याला लोक भक्कम पाठबळ देतात हा विश्वास यानिमित्ताने अधिक प्रबळ झाला. न्यायासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला एक वेगळी उर्जा आणि विश्वास गोकुळच्या लढाईने दिला. त्यामुळे गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची सुरवात झाली असून त्याची बिजे कोल्हापूरच्या भुमीत रूजली आहेत.
याचना नही अभी रण होगा,
रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा हौगा,
अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहीते- पाटील, शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील- सरुडकर, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विवेकानंद पाटील यांच्यासह शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
#कोल्हापूरचा_संघर्ष_मोर्चा #गोकुळ_वाचूया_लोकशाही_वाचूया
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 9, 2026
यावेळी बोलताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते अशी आठवणही यावेळी करून दिली.
📍दसरा चौक, कोल्हापूर
गोकुळ वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी…कोल्हापूर संघर्ष मोर्चा
सोमवार, दि. 9 नोव्हेंबर
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 9, 2026
पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे.
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 6, 2026
सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ? असा सवालही यावेळी केला.
सतेज पाटील म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा असे आवाहनही यावेळी केले.
शेवटी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya