राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यातच भाजपाचे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यातील निवडणूकीच्या प्रचारात प्रवेश होवून दोन दिवस झाले. तरी भाजपाच्या प्रचारात म्हणावा तशी हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचे मुद्दे म्हणावे तसे आले नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता आठभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे नेते अमित शाह यांनी विधानसभेच्या निवडणूकीच्या रणसंग्रामाला चक्क शिवाजी महाराज आणि अफझल खानाची लढाई असल्याची उपमा देत हिंदू-मुस्लिम मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला.
भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह हे मलकापूर येथील एका जाहिर सभेत बोलताना म्हणाले की, आज शिवप्रताप दिवस आहे. तो हाच दिवस आहे की, ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी विजापूरहून आलेल्या अफझलखानाचा वध करून महाराष्ट्रावर चालून येऊ पहात असलेल्या निझामशाहीला कडक भाषेत उत्तर दिले. त्यानुसार राज्यातील महाविकास आघाडीला ऐनकेन प्रकारे सत्ता हवी आहे. त्यासाठी ते मुस्लिमांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उलेमांनी ठेवलेल्या अटी स्विकारत आहेत. एसस्सी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी करून ते आरक्षण मुस्लिम समुदायाला देणार असल्याचा आरोपही केला.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, त्यामुळेच ही लढाई अफझलखान विरूद्ध शिवाजी महाराजांच्या दोन विचारांमधील लढाई आहे. अफझलखानच्या विचाराच्या आघाडीला पराभूत करायचे आहे. त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजाच्या विचाराप्रमाणे लढावे लागणार असल्याचे आव्हानही यावेळी केले.
तसेच यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी राहुल गांधी यांना सांगावे की, ते कधीही बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल चांगले बोलले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलावे असे आव्हानही यावेळी दिले.
यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सातत्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचे असलेल्या प्रकल्पांना विरोध करणे सुरु ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे सरकार असताना बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला विरोधा, मेट्रोच्या प्रकल्पाला विरोधा अशी विरोधाची मालिकाच सुरु होती अशी टीका करत मागील ३०-४० वर्षापासून शरद पवार हे राज्याच्या राजकारणात आहेत. मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केले असा सवालही यावेळी केला.
Marathi e-Batmya