कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार उमेदवार उभे केले. या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून चांगलीच ताकद लावण्यात आली. तर महाविकास आघाडीनेही पूर्ण ताकद लावली. या दोन्ही निकालांवरून सर्वच पक्षांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. तर कसबा पेठ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शरद पवार यांच्या मोदीबागेतील …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, बीबीसी हे केवळ उदाहरण..पण सत्ताधारी वसाहतवादी मानसिकतेचे… २०२४ ची निवडणूक बेरोजगारी, मुठभर धनिकांच्या हातात एकवटलेली संपत्ती, लघु-कुटीर उद्योगांचा झालेला नाश यासारख्या मुद्द्यावर लढली जाणार
बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद आणि त्यावर प्रतिक्रिया देत असताना सत्ताधाऱ्यांकडून वसाहतवादी मानसिकतेचा आरोप करण्यात आला, यावर प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, हे प्रकरण अदाणी यांच्यासारखेच आहे. ते देखील वसाहतवादी मानसिकतेचे लक्षण होते. ज्या ज्या ठिकाणी विरोध होतो, तिथे तिथे त्यांच्याकडून कारणे देण्यात येतात. खरेतर देशभरात विरोधातला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत …
Read More »उध्दव ठाकरेंचा पलटवार, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला पण तुम्ही दिल्लीसमोर… चोर वृत्तीला मतदान करून नका
भाजपा आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांकडून कोरोना काळात उध्दव ठाकरे घराच्या बाहेर पडत नव्हते अशी जहरी टीका सातत्याने करण्यात येत आहे. या टीकेला खेड मधील सभेत प्रत्युत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि …
Read More »उध्दव ठाकरेंची टीका, देशद्रोही बोलाल तर जीभ हासडून देईन, मग संगमांचं काय… खेडमधील जाहिर सभेत शिंदे गटाबरोबर भाजपावर साधला निशाणा
केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभेनिमित्त आले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही विधानावरून चांगलाच दम …
Read More »विरोधी पक्षांनी लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचे प्रतिक्रिया, तरीही सुटका नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे काम
महाराष्ट्रापाठोपाठ, झारंखडचे मुख्यमंत्री सोरेन, दिल्लीतील आम आदमी पार्टीचे उपमुख्यमंत्री, पश्चिम बंगाल मध्ये तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनर्जी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या आमदारांवर विविध यंत्रणांकडून दबाव आणत त्यांचे सरकार अस्थिर करण्यात आले. पैकी दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची प्रदीर्घ चौकशी करून अटकेची कारवाई …
Read More »ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला भाजपा-शिंदे गटाकडून आशिर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर सहा लोकसभा क्षेत्रात होणार आशीर्वाद यात्रा-भाजपा नेते आशिष शेलार
मागील दोन-तीन दिवसांपासून ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे आदी राज्याच्या विविध भागात दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा, शिंदे गटाच्या विरोधात जाहिर सभा घेत आहेत. यापार्श्वभूमी भाजपा या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून रविवारपासुन मुंबईत सहा जिल्ह्यात …
Read More »नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांचा सवाल, महाराजांनी सांगितले का? शहराला नाव देऊन….. हिमंत असेल तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेतून निवडणूक लढवावी
राज्यातील सत्तांतरापासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या घोषणेला अखेर केंद्र सरकारने मान्यता देत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर …
Read More »तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बँनर्जी यांच्या “या” घोषणेने आघाडीला ब्रेक सागर दिघी पोट निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बँनर्जी यांचा एकला चलो चा नारा
कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत देशातील भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न केला. तसेच भारत जोडो यात्रेला देशातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याने भाजपाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी धर्मनिरपेक्षवादी राजकिय पक्षांकडून आघाडी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच तृणमुल काँग्रेसच्या …
Read More »आशिष शेलारांचा आरोप, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली भाजपा नेते आमदार शेलार यांची विधानसभेत खळबळजनक माहिती
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिला गेलेला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून आघाडी सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, अशी खळबळजनक माहिती भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत उघड केली. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर भाषण करताना आमदार शेलार यांनी सांगितले की, …
Read More »निकालानंतर उध्दव ठाकरे यांचा टोला, एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर आला… भाजपची निती वापरा आणि फेका, शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला
पुणे शहरातील कसबा पेठ निवडणूकीत २८ वर्षानंतर भाजपाचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला खोचक शब्दात टोला लगावला. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, एवढ्या वर्षांच्या भ्रमातून कसबा बाहेर आला आता देशही बाहेर पडेल, …
Read More »
Marathi e-Batmya