छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिवशाहीर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या मनातील शिवसृष्टीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, मला आज यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य आठवतं आहे ते म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते तर भारताचं काय झालं …
Read More »रोहित पवारांचा खोचक टोला, पुण्यात असूनही अमित शाहंनी प्रचार करणं टाळलं यातच सगळं आलं कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात काय निकाल लागणार बहुधा अचूक हेरलं असावे असा
पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या दोन्ही जागा राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईसह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असूनही कसबा आणि चिंचवड येथील भाजपा-शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली नाही. विशेष म्हणजे काल …
Read More »अमित शाहंचे येणे, कोश्यारींचे जाणे, आयोगाचा निकाल “आप क्रोनॉलॉजी को समझिए” ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंच्या हातीः मॅटर स्क्रिपटेड?
राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे सादर करण्यात आलेली कागदपत्रे कोणती याबाबतचा अद्याप खुलासा झाला नाही. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येणे त्याच्या एक दिवस आधी भगतसिंग कोश्यारी यांचा …
Read More »अजित पवारांचा पलटवार, त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात… ४४० व्होल्टच्या टीकेवर अजित पवारांची तुफान टोलेबाजी
चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न भाजपा-शिंदे गटाचे अधुरेच राहिले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »उध्दव ठाकरेंचे कारमध्ये उभे राहुन भाषण …भाजपा म्हणते कॉपी बहाद्दर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टीका केली
शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे अनेक ठिकाणी पक्षवाढीसाठी आपल्या कारने जात असत. तसेच त्या कारच्या बोनेटवर उभे राहून सभेला संबोधित करायचे. अगदी आज त्याचप्रमाणे उध्दव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण सटकल्यानंतर हजारो शिवसैनिक कालपासून मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांना समर्थन देत आहेत. मात्र आज …
Read More »उध्दव ठाकरेंनी दिले शिंदे गटाला आव्हान,.. मैदानात उतरा, कोण जिंकतो ते बघुया आयोगाच्या निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केली गर्दी
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला. आज दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले. त्यावेळी मातोश्रीबाहेर …
Read More »शिंदेंच्या त्या टीकेवर सुषमा अंधारे म्हणाल्या,…तर एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण भाजपाकडे गहाण उध्दव ठाकरेंवर केलेल्या आत्मपरिक्षणाच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षात लोकशाही नसल्याचे दिसून येत असल्याचे कारण पुढे करत आणि शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना आत्मपरिक्षण करण्याचा खोचक सल्ला …
Read More »नाना पटोलेंचा खोचक सवाल, देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने? नाव आणि चिन्ह काढून घेतलं तरी जनतेचा आशिर्वाद कसा काढून घेणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा …
Read More »आयोगाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो… बाळासाहेबांचा विचार तीच खरी शिवसेना
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंडळींचं अभिनंदन करत होतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार …
Read More »फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले,… त्यांनाच विचारण्याची गरज त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायचं नाही
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्यासोबत घेतलेला पहाटेच्या शपथविधी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आला. त्यानंतर गणित काय बदलली हे अजित पवार …
Read More »
Marathi e-Batmya