जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. महेश तपासे म्हणाले, राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. …
Read More »चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करत ऊर्फी जावेदने घेतली चाकणकरांची भेट पोलिस ठाण्यातही केली तक्रार दाखल
मागील काही दिवसांपासून अभिनेत्री मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आघाडी उघडली होती. तसेच ऊर्फी जावेदच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून कोणतीच कारवाई न केल्याने चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद …
Read More »सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, भाजपामध्ये कर्तृत्वान महिला भले आमदार नसल्या तरी पण भाजपाला महिलांचा आदर नाही
मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद हीच्यात वाद सुरु आहे. तसेच या वादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातही वाद निर्माण झडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …
Read More »भाजपाची टीका, घटनाबाह्य रीतीने पद पटकावणाऱ्या ठाकरेंकडून महाराष्ट्राची फसवणूक शिवसेना पक्षप्रमुख पदावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडत सरकारला घटनाबाह्य ठरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर निष्ठा असलेल्या तमाम शिवसैनिकांची आणि घटनाबाह्य पदाचा फायदा घेत मुख्यमंत्रीपद पटकावून महाराष्ट्राची फसवणूक केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी व पक्षप्रमुख पदावरून पायउतार व्हावे असे आव्हान प्रदेश भाजपाचे …
Read More »हसन मुश्रीफ यांचा आरोप, किरीट सोमय्याकडून विशिष्ट लोकांना लक्ष्य नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांची नावे घेतल्याने केला आरोप
आज ईडीने पहाटेपासून हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावर छापे टाकत सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत सोमय्या हे फक्त विशिष्ट …
Read More »ठाकरे विरूध्द शिंदे, संघर्षावरील सुनावणी आता व्हेलॅनटाईन डे च्या दिवशी ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उभी फूट पाडत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेनेचे आणि १० अपक्ष आमदार सोबत गेले. यापैकी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणी पोटी उध्दव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव …
Read More »कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवार जाहिर भाजपा-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, जणगणनेचा अधिकार केंद्र सरकारलाच
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा शूद्र पूर्वी कोण होते पुस्तकाद्वारे डॉ.आंबेडकरांनी पहिल्यांदा मागणी केली होती
बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र पाठवित केली. छगन भुजबळ यांनी …
Read More »काँग्रेसचे डॉ विश्वजीत कदम वाकून देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले पुन्हा एकदा भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेला सुरुवात
काँग्रेसचे दिवगंत नेते डॉ.पतंगराव कदम हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून राहिले. मात्र त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे सुपूत्र डॉ विश्वजीत कदम हे सातत्याने भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यातच आज दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ परिसरात, भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग …
Read More »शरद पवार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देईल
आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमोरचे प्रश्न सोडविण्याला हातभार …
Read More »
Marathi e-Batmya