Tag Archives: bjp

भाजपाच्या तोडफोडीच्या व दहशतीच्या राजकारणाला अंधेरीच्या विजयाने चोख उत्तर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त …

Read More »

विजय झाला तरी पण उध्दव ठाकरेंसमोर खडतर आव्हाने

शिवसेनेतील फुटीनंतर पहिली लिटमस टेस्ट अर्थात अंधेरी पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजपाकडून मुर्जीत पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वास्तविक पाहता या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट यांच्यात थेट सामना होईल अशी अटकळ बांधण्यात …

Read More »

एकेरी वाटणारी पण नोटामुळे चुरसीच्या निवडणूकीत ऋतुजा लटके विजयी

अंधेरी पोटनिवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार स्व.रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता ही …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, ‘भारत जोडो यात्रे’च्या धसक्यानेच भाजपाच्या बावनकुळेंची झोप उडाली

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून अभूतपूर्व अशी भारत जोडो यात्रा निघाली असून पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रेत सर्व जाती धर्मांचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून जगानेही या पदयात्रेची दखल घेतली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा ओस पडत असताना पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष व …

Read More »

गुलाबराव पाटील यांचा दावा, तर राष्ट्रवादीने भाजपासोबत सत्ता स्थापन केली असती

राज्यात तीन महिन्यापूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी शिवसेना पक्षाला संपवत असल्याचा आरोप करत शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात बंडखोरी केली होती. त्यानंतर शिंदे गटाने भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यात आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. २०१९ साली राष्ट्रवादीने भाजपाबरोबर शपथ घेतली होती. …

Read More »

अजित पवारांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री देसाई प्रत्युत्तर म्हणाले, मग ती बेईमानी नव्हती?

सध्या शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, ज्या घरात वाढलो त्याच घराला उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेवर …

Read More »

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

जयंत पाटील खोचक टोला, मग हा ईश्वरीय संकेत गुजरातला मिळाला…

काही दिवसांपूर्वी गुजरात मधील मच्छु नदीवरील झुलता पूल नव्याने उद्घाटन केल्यानंतर कोसळून १४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा दुर्घटनांवरून राजकारण काँग्रेस करू इच्छित नाही असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. तसेच इतर राजकिय पक्षांनीही याबाबत समंज्यसपणा दाखविला. मात्र सोशल मिडीयावर पश्चिम बंगालमध्ये पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान …

Read More »

जयंत पाटील म्हणतात, राष्ट्रवादीवर जेव्हा टीका होते याचा अर्थ पक्ष बलशाली

आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो, ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या …

Read More »

भाजपा म्हणते, खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू

महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी …

Read More »