भाजपा नेत्या आणि ‘बिग बॉस १४’ च्या स्पर्धक सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. २२ ऑगस्ट रोजी रात्री त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये वाइल्कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सध्या सोनालीचा मृतदेह …
Read More »जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिवाजी महाराज सुरतेला लुटायला गेले अन् तुम्ही…. पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते हे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात का येत नाही..
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली… त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात… तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्यांना, आमदारांना तर कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना …
Read More »तो व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या; अमित शहाजी, शिंदे गटाच्या आमदारांना… मविआच्या आमदारांना धमकावणारा शिंदे गटाचा व्हिडीओ ट्वीटरवर केला शेअर
महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री …
Read More »नाना पटोले म्हणाले, २०१४ पासून लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार महागाई, बेरोजगारीसह जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर केंद्र सरकार फेल
लोकशाही व संविधानाच्या तत्वांवर देशात आजपर्यंत सरकारे काम करत होती परंतु २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हुकूशाही पद्धतीने काम करत आहे. २०१४ पासूनच देशात आणीबाणी सुरू असून विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी व विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय, आयकर सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे, असा …
Read More »शिंदे गटाचे सुहास कांदे म्हणाले फडणवीस यांना, आम्ही त्या गोष्टीसाठी तुमच्यासोबत आलो अन… विधानसभेतच धरला आग्रह, भुजबळांची केस रिओपन करा
विधानसभेत एकनाथ शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री (छगन भुजबळ) यांनी घोटाळा केल्याचे आरोपपत्रात लिहिलेले असतानाही आणि त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याविषयीचा पत्रक काढलेले असतानाही त्या मंत्र्याच्या विरोधात अपील का केले नाही? असा सवाल करत त्या मंत्र्यांच्या विरोधात अपील करणार असे जाहिर …
Read More »शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा, एकिकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलयचं अन… बिल्कीस बानो प्रकरणावरून केली टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच टीका केली. नवी दिल्लीत आज आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. …
Read More »न्यायालयाची सुनावणी पुढे ढकल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आपण संघर्ष करू त्यांनी लाज लज्जा सोडली
शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाची एकनाथ शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना …
Read More »पन्नास खोके, माजलेत बोके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपाच्या दारी… महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने ...
ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले… अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोदी सरकारला घरचा आहेर, वेळेवर निर्णय घेत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर पहिल्यांदाच गडकरींकडून भाष्य
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे जसे कामाच्या बाबत गतीमान आहेत, तसेच ते बोलण्याच्या बाबतही स्पष्ट असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कधी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून जिवंत राहीला पाहिजे, काँग्रेस सोडू नका, तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून नागरिकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करा असे जाहिर सल्ले …
Read More »उध्दव ठाकरे यांचा पलटवार, फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे याचा स्ष्ट अर्थ मोदी पर्व संपत आल्याची नांदी
भाजपाच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री घरात बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा युतीचा महापौर आपल्याला बसवायचा असा निर्धार व्यक्त केला. तसेच …
Read More »
Marathi e-Batmya