Tag Archives: bjp

मुनगंटीवारांच्या “वंदे मातरम”ला काँग्रेसकडून “जय बळीराजा” चे प्रत्युत्तर अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत; शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार मिळालेच पाहिजे

खाते वाटप झाल्याबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आता फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणावे असा आदेश जारी केला. यावरून राजकिय पटलावर त्याचे पडसाद उमटत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांच्या या घोषणेला प्रत्युत्तर देत फोनवरून आता जय बळीराजा म्हणा असे जाहिर केले. यावेळी …

Read More »

नाना पटोले यांच्या टीकेवर मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधक त्या चष्म्या… सगळं समोरच दिसतंय की

शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात भाजपाने स्वतःकडे महत्त्वाची खाती ठेवली आणि शिंदे गटाला केवळ झाडी, डोंगर दिल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बंडखोर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, खातेवाटपाचं काम आम्ही खूप समन्वयाने केलं. भाजपा …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, …दुरंग्यापासून सावध रहा काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस या महानायकांसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष व बलिदानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला व तिरंगा डौलाने फडकला. परंतु या तिरंग्याला न माननारे काही लोक आहेत ते लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आवडीच्या गृह बरोबरच राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही भाजपाच्या हिश्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार, विधि व न्याय

मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल चाल दिवसानंतर १८ मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहिर करण्यात आले. या खाते वाटपावर भाजपाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणती खाती येणार याबाबत अटकळ बांधण्यात येत होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीचे खाते गृह आणि राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असलेले वित्त हे …

Read More »

वादग्रस्त असूनही मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मिळाली ‘ही’ खाती सत्तारांकडे कृषी तर राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन

शिंदें-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या ऐन तोंडावर बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची टीईटी परिक्षेच्या घोटाळ्यात मुलींची नावे पुढे आली. तर शपथविधी सोहळ्यानंतर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाच्याच महिला नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंपद मिळणार का? किंवा संजय राठोड …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारावरून उध्दव ठाकरे म्हणाले, आपण पुन्हा गुलामगिरीत… राज्य सरकार आहे कुठे शेतकरी बेहाल

आपण स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. त्यापूर्वी १५० वर्षे ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात होतो. त्यावेळी आपण गुलामगिरीत होतो. पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत ते पुढे म्हणाले की, व्यंगचित्रकारांना एवढंच सांगतो, …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, यांची बावन असतील नाहीतर एकशेबावण पण शिवसेनेला… हर घर तिरंगा म्हणे पण घर नाही त्याने काय करायचे

शिवसेना कोणाची? आणि अपात्रतेच्या मुद्यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मागील काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांनी जाहिरपणे बोलण्याचे टाळले होते. यापार्श्वभूमीवर मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. मात्र …

Read More »

अजित पवार म्हणाले, सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा एकच आवडता शब्द… शहिद आणि सरकारच्या भवितव्यावरून अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जवळपास सव्वा महिना पूर्ण झाला. त्यानंतर या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. परंतु या मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ गावी अर्थात तापोळा-दरे गावात स्थानिक नागरीकांकडून नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बंड करताना थोडाजरी …

Read More »

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिंदे गट आणि आमचे… सांगितली भविष्यकालीन योजना

राज्यात सत्तांतर होताच भाजपामध्येही आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून मागील काही काळापासून चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून नारळ देत भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. तर दुसऱ्याबाजूला मुंबईच्या अध्यक्ष पदावरून मंगलप्रभात लोढा यांना हटवून त्यांच्या ठिकाणी आशिष …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ अभियानात भाजपाकडून तिरंग्याचा अपमान भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांवरच कारवाईचा बडगा

जुलमी ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर देश लोकशाही व संविधानाच्या मार्गाने चालत होता पण मागील आठ वर्षापासून लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. ब्रिटिश राजवटीत ज्याप्रमाणे सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात त्याच पद्धतीने आज भाजपा सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे आणि जे भाजपाबरोबर जातील …

Read More »