मुंबई: प्रतिनिधी देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पाठविले. सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले …
Read More »पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी …
Read More »बदल्यांची सीआयडी चौकशी करा अन्यथा न्यायालयात दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले, बदली कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, …
Read More »बिहार समर्थक महाराष्ट्र भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक …
Read More »गणेशोत्सवासाठीची कोंकण रेल्वेची पहिली रेल्वे उद्या धावणार उद्यापासून बुकींग आणि गाडी धावणार
मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सव काळात मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यास अखेर यश आले असून १५ ऑगस्ट २०२० पासून कोकणात जावू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर २०० गाड्या धावणार असल्याची माहिती कोकण आणि मध्य रेल्वेने एका प्रसिध्दी पत्रकान्वये आज जाहीर …
Read More »कहाँ गए वो २० लाख करोड ? या प्रश्नाची भाजप व मोदींना भीती का वाटते ?: सत्यजीत तांबे
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड? हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहां …
Read More »काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे तरी धाडस दाखवावे भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आव्हान
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमातून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे . याउलट महाआघाडी सरकारने राज्यात एका ‘कवडी’चेही पॅकेज गोरगरिबांना दिलेले नाही. भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावे, तेवढे धाडस राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दाखवावेच असे आव्हान भाजपा मुख्य प्रवक्ते केशव …
Read More »१९४२ च्या लढ्याला विरोध करणाऱ्या विचारधारेचे सरकार संविधानाला पायदळी तुडवतेय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज रहावे. असे आवाहन …
Read More »महाविकास आघाडीने फडणवीस सरकारवर केलेला आरोप स्वत:च खोडून काढला राज्याच्या डोक्यावर ५ लाख ५० हजार कोटींचे नव्हे तर ३ लाख ७ हजार कोटींचे कर्ज
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या डोक्यावर तब्बल ५.५० लाख कोटींचे कर्ज केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेकांनी केला. परंतु राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे महसुली उत्पन्न कमी झाल्याने आवश्यक असलेली रक्कम रक्कम उभी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने २ …
Read More »सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन मोर्चा अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे याचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज …
Read More »
Marathi e-Batmya