Tag Archives: bombay high court

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाच्या वतीने पत्नीची उच्च न्यायालयात याचिका पत्नीला कायदेशीर पालकत्व द्या

अंथरुणात खिळलेल्या पतीचे कायदेशीर पालकत्व आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका पत्नीच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तिच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठतांना याचिकाकर्त्यींच्या पतीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले. तसेच याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत त्याच्या मालमत्तेबाबत निर्णय जैसे थे ठेवण्याचे आदेश …

Read More »

न्यायमूर्तींवरील बदनामीकारक आरोपाची उच्च न्यायालयाकडून दखल वकील निलेश ओझाविरोधात अवमान कारवाई

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर पत्रकार परिषदेदरम्यान उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीविरुद्ध निंदनीय आणि बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाने मंगळवारी वकील नीलेश ओझाविरुद्ध स्वतःहून अवमान कारवाई सुरू केली. पत्रकार परिषदेत ओझा यांनी केलेले विधान अवमानकारक असल्याचे विशेषपीठाने नमूद करून त्यांच्याविरोधात अवमान कारवाई का केली जाऊ नये, अशा विचाऱणा …

Read More »

कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाची शिवसेना शिंदे गटाला नोटीस एकनाथ शिंदेविरोधातील विडंबनात्मक गाण्याचे प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हास्यकलाकार कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. पोलीस, तक्रारकर्ते तथा शिवसेना आमदार मुरजी पटेल यांना न्यायालयाने नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. एम. एस. …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी, औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस ॲड. प्रकाश आंबेडकरांनी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात मांडली

परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत २९ एप्रिल पूर्ण उत्तर द्यावे असे …

Read More »

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश, पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करा अक्षय शिंदे चकमक प्रकरणी न्यायालयाचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्युसाठी दंडाधिकाऱ्यांनी जबाबदार पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचेही स्पष्ट केले. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे उघड झाले असून दंडाधिकाऱ्यांनी अहवालात ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …

Read More »

गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामराची उच्च न्यायालयात धाव; तातडीची सुनावणी मंगळवारी उच्च न्यायालयाकडून सुनावणी

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हस्यकलाकार कुणाल कामराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी संबंधित एकलपीठाकडे दाद मागण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. कुणाल कामराच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती कुणाल कामराच्या वतीने …

Read More »

उच्च न्यायालयाचा निर्णय, ब्लॅक मॅजिक कायदेशीर धार्मिक प्रथा नाही… आरोपींना दोषमुक्त ठरविण्याचा निर्णय योग्य ठरवला

महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक कायद्यांतर्गत एका आरोपीची मुक्तता कायम ठेवताना, मुंबई उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की या कायद्याचा उद्देश मानवी बळी किंवा फसव्या विधी यांसारख्या हानिकारक प्रथांना आळा घालणे आहे आणि कायदेशीर धार्मिक प्रथा नाही. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांनी निरीक्षण  नोंदविले की, “काळ्या जादूचा कायदा मानवी बलिदान, फसव्या …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने उद्योगपती अनिल अंबानी यांना ठोठावला २५ हजारांचा दंड अर्जंट हेअरिंग घेण्याची मागणी केली म्हणून ठोठावला दंड

उद्योगपती अनिल अंबानी यांना झटका देताना, मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच त्यांना प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या एप्रिल २०२२ च्या नोटीसला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीसाठी त्यांच्यावर २५,००० रुपये ठोठावले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, एप्रिल २०२२ मध्ये आयकर विभागाने त्यांना …

Read More »

एनआयएचे प्रतिज्ञापत्र, आनंद तेलतुंबडे यांच्यामुळे देशाच्या अखंडतेला धोका मुंबई उच्च न्यायालयात एनआयएने दाखल केले प्रतिज्ञापत्र

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की दलित हक्क कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) (सीपीआय-एम) चे सक्रिय सदस्य आहेत आणि भारताच्या ‘सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला’ ‘धोका’ देणाऱ्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना शैक्षणिक कामांसाठी अॅमस्टरडॅम आणि युनायटेड किंग्डममध्ये जाण्याची …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, दिशा सालियन प्रकरण अन्य खंडपीठाकडे वर्ग उच्च न्यायालयाचे महानिबंधक कार्यालयाला आदेश

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका योग्य खंडपीठासमोर सादर करण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने महानिबंधक कार्यालयाला दिले. उच्च न्यायालयाने ही याचिका महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित असल्यामुळे न्या. सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणे अपेक्षित असल्याचे सालियनच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, त्याची दखल घेऊन न्या. …

Read More »