मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर भाजपाकडून पहिल्यादांच आपली भूमिका जाहीर करत कधीही आनंदाची बातमी जाहीर होणार असल्याचे सांगत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »शिवाजी महाराज स्मारक, डॉ.आंबेडकर स्मारक आगामी पाच वर्षात पूर्ण करण्याचा भाजपाचा संकल्प आगामी पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलून जाण्याचा भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांचा विश्वास
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे श्रध्दास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या या दोन्ही स्मारकाचे काम अद्याप पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचे काम आगामी पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचा संकल्प भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करत १ कोटी नोकऱ्यांची …
Read More »भाजपाने आमदार चरण वाघमारेसह चारजणांना दाखविला घरचा रस्ता बंडखोर उमेदवारी मागे न घेतल्याने पक्षातून निष्कासित
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत तिकिट मिळेल, नाही मिळाले तर बंडखोरी करत निवडणूकीच्या रिंगणात उतरणारे तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे, नगरसेविका गीता जैन यांच्यासह चार जणांना पक्षातून काढून टाकल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या आमदार …
Read More »भाजपाने रासपला फसविले, धोका दिला महादेव जानकर यांच्या निमित्ताने महायुतीतील खदखद बाहेर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेने गतवेळच्याप्रमाणे महायुतीची घोषणा केली. या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विधानसभेच्या जागा दिल्या नसल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगत आम्हाला फसविल्याचा जाहीर आरोप भाजपावर केला. महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपाने मला …
Read More »ब्राम्हण आर्थिक विकास महामंडळाच्या आश्वासनानंतर चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा कोथरूडमधील उमेदवारी मागे घेण्याचे संघटनेची तयारी
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी कोथरूडमधील स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरचा अर्थात कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला. तसेच पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिला. मात्र याप्रश्नी बैठक होत ब्राम्हण महासंघाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासंघाने पाटील यांच्या विरोधातील भूमिका मागे घेत त्यांना …
Read More »चंद्रकांत दादा, शिवस्मारकावर एकदा होवूनच जाऊ द्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे खुल्या चर्चेचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे अराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकात झालेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक व असहनीय आहे. सरकारकडून या प्रकाराची चौकशी करण्याकरिता टाळाटाळ केली जात असून भ्रष्टाचार झाकण्यासाठी धादांत खोटी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »कोल्हापूरकरांच्या रोषाला चंद्रकांत पाटील घाबरले पुण्यातून घेतली उमेदवारी
कोल्हापूर-मुंबईः प्रतिनिधी कृष्णा आणि पंचगंगेला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर जिल्हा पूर्णतः पाण्याखाली गेला. मात्र कोल्हापूरचे रहिवासी असलेले राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करवीरवासीयांच्या मदतीला धावण्याऐवजी पुण्यात राहणे पसंत केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या टीकेची परिणती विधानसभा निवडणूकीत होवू नये म्हणून नियोजित शिराळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी …
Read More »भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून उमेदवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मी काय किंवा माझ्या घरातील कोणीही भाजपाच्या तिकिटावर निवडणूकीला उभे राहीले तर कोणालाही मतदान करू नका तुम्हाला बिरोबाची शपथ आहे, असे भाजपाविरोधाचे आवाहन करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना आज भाजपाचे पावन करून घेत बारामतीतून उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव …
Read More »पुण्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून बचावकार्य सुरु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक महसूल, पोलीस व इतर प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरफच्या टीम तातडीने कार्यरत करण्यात आल्या आहेत. बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन …
Read More »शिवस्मारक उभारता न आल्याचे विरोधकांना शल्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, …
Read More »
Marathi e-Batmya