Tag Archives: chief minister

नाना पटोलेंचा सवाल, विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खा. संजय राऊत प्रकरणी चौकशी करून दोषींना अद्दल घडवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करणार सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कणेरी मठ येथे २० ते …

Read More »

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकारः मात्र नियमित याचिकेसोबत यावरही सुनावणी घ्या

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत सर्वचस्तरातून संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज सकाळी याचिका दाखल करत या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेता येत नसल्याचा निर्णय दिला. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादानेच आपल्याला शिवसेना हे नाव मिळाले

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री …

Read More »

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात घेतली शपथ

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले “मॅग्नेटिक महाराष्ट्र” ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’

केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच येत्या ऑक्टोंबरमध्ये “मॅग्नेटिक महाराष्ट्र” …

Read More »

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारकडून वेतनासाठी पैसे महाविकास आघाडीच्या काळातील भाजपाचे नेते मात्र गायब

मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे थकित पगारीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला. त्यानंतर परभणीतील एका एसटी कर्मचाऱ्यांने पगार न मिळाल्याने भेडसावत असलेल्या आर्थिक तंगीमुळे अखेर काल आत्महत्या केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अखेर २५० कोटी रूपये एसटी …

Read More »

उज्वल निकम म्हणाले, स्वायत्त संस्थाचा अधिकार सर्वोच्च न्यायालय घेईल का? हा प्रश्न नबाम रेबिया, परिशिष्ट १० पेक्षा स्वायत्त संस्थांचे अधिकाराबाबतचा प्रश्न महत्वाचा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेले तीन दिवस झालं, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ की ७ जणांच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवायची, यावरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. पण, तिनही दिवसांच्या सुनावणीत नबाम रेबिया प्रकरणावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, जून्या पेंशन योजनेत मध्यमार्ग काढत शिक्षकांची ३० हजार पदे भरणार राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्र्याची घोषणा

शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय …

Read More »

‘दिवाण-ए-आम’ मधील शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर राहणार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार

आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची …

Read More »