Tag Archives: chief minister

सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारला टोला, सोय केली म्हणून ज्योतिर्लिंग दिला नाहीत ना? आसामच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची टीका

काही दिवसांपूर्वी आसाम सरकारने भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र सहावे ज्योतिर्लिंग हे आसाम असल्याचा दावा केला. त्यामुळे जोरदार वाद उफाळला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आसाम सरकारची ती जाहिरातच ट्विट करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवित …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल कोश्यारींच्या अभिनंदनासह घेतले हे ६ निर्णय पीएम श्री योजनेत ८४६ शाळांचा समावेश

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच पुणे जिल्ह्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर झाल्याने या निवडणूकीच्या प्रचारात सगळेच नेते व्यस्त झाले आहेत. त्यातच राज्यपालांच्या इच्छेनुसार त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मु यांनी स्विकारत नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज …

Read More »

संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि १३५ फुट उंच धवल रंगाच्या सेवाध्वजाची स्थापना रिमोट कंट्रोलद्वारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, शेतकरी लाठीचार्जची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करा शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पोलिस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा

शेतमालाला दववाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला. आपल्या न्याय व हक्कासाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलिस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पातील भरीव निधीमुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, …

Read More »

काँग्रेसची मागणी, MPSC ने नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर करावा नवा अभ्यासक्रमानुसार २०२५ पासून परिक्षा घेण्याचे प्रसिद्धीपत्र आयोगाने जाहीर करावे

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून करावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु एमपीएसीने राज्यसेवा परिक्षेसंदर्भात अजूनही या निर्णयाबद्दल स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. दोन दिवसापूर्वी आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने २०२३ पासून होतील असे जाहीर केले …

Read More »

३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं, …

Read More »

मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होऊन ती सुरळीत होणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत …

Read More »

डॉ सातव हल्याप्रकरणी नाना पटोलेंचा निशाणा, फडणवीसांची पोलिस दलावर पकड नाही… काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करा

काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून तर राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल …

Read More »