गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन आठवडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली नाही. त्यामुळे आज शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत एकदम १५ निर्णय घेतले. यामध्ये कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आणि शाळा आणि ग्रंथालय अनुदान मंजूर, यासह अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले. जवळपास १५ निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ते …
Read More »मंत्रिमंडळ उपसमितीने ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना दिली मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचं राज्य शासनाचे धोरण आहे. सकारात्मक …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले आहे का ? सत्तेची मस्ती चालू देणार नाही सत्ताधाऱ्यांच्या मस्तवालपणा विरोधात मुंबईत १७ तारखेला महाविकास आघाडीचा महामोर्चा
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने चार महिन्यातच राज्याचा नावलौकिक रसातळाला मिळवला असून महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करुनही भाजपा नेत्यांवर कारवाई होत नाही. महापुरुषांच्या अपमानाबद्दल जनतेत तीव्र संताप आहे पण सत्ताधारी मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. …
Read More »पेपरलेस लाईट बिलाची सुरुवात करा अन वीज बिलात १० रूपये सूट मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली असून त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल. त्या दिशेने महावितरणने बिलांच्या बाबतीत यापूर्वीच काम सुरू केले असून गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी आणि प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळवावी, असे …
Read More »लेकी, आया-बहिणी असुरक्षित अन् निर्भया पथके फुटीर आमदारांच्या दिमतीला? सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? - प्रा. डॉ. मनीषा कायंदे
उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील लेकी, आया-बहिणी यांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेली निर्भया पथके सध्या गायब आहेत. महिला सुरक्षा वाऱ्यावर असून शिंदे गटाच्या फुटीर आमदारांच्या दिमतीला ही निर्भया पथके तैनात करण्यात आली आहेत. लेकी, आया-बहिणी यांची सुरक्षा काढून घेऊन ती आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी वापरणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध असो. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे …
Read More »उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर टीका, दिलेलं स्क्रिप्ट फक्त बोलतात.. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे आक्रमक उत्तर द्यावं
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाने जाताय, मग ही टोल दर पाहून जा असे असणार टोल दर
बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गासाठी नेमका कितीची टोल असणार याबाबत सातत्याने वेगवेगळे दर आकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र,समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधीच अर्थात काल १० डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारकडून टोलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. तर …
Read More »उध्दव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेना प्रत्युत्तर, मीच केलय…अरे नाही बाबा समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनानंतर ठाकरे यांनी केली शिंदेवर टीका
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मोठा वाद चालू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणतीच भूमिका मांडत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही बसवरा बोम्मईंनी …
Read More »समृध्दीच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न.. उध्दव ठाकरे यांचे नाव घेता केली टीका
नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी एक्सप्रेस वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत सूचक विधान केले. त्यामुळे समृध्दी महामार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रकल्पासाठी जमिन देऊ दिली नसल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री …
Read More »उध्दव ठाकरेंच्या आव्हानाला बगल देत पंतप्रधान मोदी म्हणाले, राजकारणात एक विकृती येतेय… बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने पूर्ण झालेल्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गावर लागणाऱ्या लागणाऱ्या पहिल्या टोल नाक्यावर वायफळ येथे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्नाटककडून सीमाप्रश्नी करण्यात येत …
Read More »
Marathi e-Batmya