मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित करून महाराष्ट्र सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार झुकले यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होणार अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. मात्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले ? नरेंद्र मोदींनी आधी गुजरातची वाट लावली आणि नंतर देशाला २५ वर्षे मागे नेले, हा वाढदिवस नाही तर ‘काळा दिवस’ !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जिवनात २५ वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करा, असे आवाहन भाजपाकडून करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांचा व त्यांच्या पक्षासाठी मोठा असेल पण मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ …
Read More »अर्थ मंत्रालयाची स्पष्टोक्ती, शुल्क आकारणीवर बाहेरील देशाचा दबाव नाही विरोधकांच्या आरोपावर वित्त मंत्रालयाची भूमिका
युपीआय (UPI) व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू करण्याचा निर्णय परदेशी दबावामुळे घेण्यात आला, या आरोपांचे केंद्र सरकारने बुधवारी खंडन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, भारताचे युपीआय धोरणात्मक निर्णय “स्वतंत्रपणे” घेतले जातात …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, खरीप वाया गेला आता रब्बीवरही संकट पण मदत कुठे आहे? बळीराजा संकटात असताना महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही, मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लीम वादातच सरकारला स्वारस्य
राज्यात यावर्षी सरासरी २५ टक्के पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे, शेतातील उभी पिकं करपून गेली आहेत. शेतकरी मोठ्या संकटात असून आत्महत्या वाढतायेत. राज्य सरकारने कर्जमाफी केली, त्याचा फायदा झालेला नाही. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्याला बसत आहेत पण महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही. शेतकरी संकटात असून मदतीचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सेवा संकल्प अभियान नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करा; अन्यथा अमित शहांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे केवळ भ्रष्टाचाराच्या हिशोबाचा दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाची राजधानी दिल्ली असली …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, ब्रिक्स परिषदेतही पंतप्रधान मोदी यांनी मांसाहार करणाऱ्या पाहुण्यांना शाकाहरी जेवण दिले ८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत पण भाजपाकडून मात्र जबरदस्तीने शाकाहारी जेवण करायला भाग पाडते
नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या स्नेहभोजनात (गाला डिनर) केवळ शाकाहारी पदार्थ ठेवल्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आणि “८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत,” असा दावा केला. या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सरकारवर परदेशी पाहुण्यांवर आपल्या …
Read More »मनमोहन सिंग यांना आदरांजलीः मलेशियाचे पंतप्रधान आणि राहुल गांधी यांची भेट राहुल गांधी यांची भेट घेत चहापानही घेतले तसेच मनमोहन सिंग यांच्याबद्दलची एक आठवणही सांगितली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची नाश्त्यादरम्यान भेट घेतली आणि भारत-मलेशिया संबंधांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे मलेशियाचे प्रतिनिधी म्हणून नवी दिल्लीत आयोजित ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या निमित्ताने भारतात आले आहेत. मलेशिया …
Read More »डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने अभ्यासू, संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण- हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. समाजवादी विचारांसोबतच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असलेल्या डॉ महाजन यांनी आयुष्यभर आपली वैचारिक भूमिका आणि मूल्यांशी असलेली बांधिलकी जपली. महाराष्ट्राने एक अभ्यासू, संयमी नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना …
Read More »नाना पटोले यांची मागणी, राज्यात दुष्काळ जाहीर करून भरीव मदत द्या ओबीसी समाजाला खुल्या प्रवर्गात टाकण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा डाव.
राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडासह अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. शेतकरी चिंतेत असून शेतातील पिके करपून गेली आहेत. कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने दुष्काळ जाहीर करुन मदत दिली त्याच पद्धतीने फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर यांना भरीव मदत द्यावी, जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही नाना पटोले यांना केली. नाना पटोले पुढे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विकास कामाच्या नावाखाली मुंबईची तिजोरी साफ करण्याचे काम सुरु असून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या कामावर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर आहेत. भ्रष्टाचार व टक्केवारीत मग्न असलेल्यांना न्यायालयाने मोठी चपराक …
Read More »
Marathi e-Batmya