मुंबई: प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड …
Read More »भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला लागले म्हाडाचे वेध, जोडीला राष्ट्रवादीची शिफारस झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मुख्याधिकारी पदी नियुक्तीसाठी लॉबींग
मुंबई : विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन वर्षापूर्वी महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आणि सहकार विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांना आयएएस पदावर प्रमोशन मिळवून देण्याप्रकरणी मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अधिकाऱ्याला म्हाडात येण्याचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे त्या पदावर सदर अधिकाऱ्याला नियुक्ती मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिफारस पत्र …
Read More »अखेर नाराज खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून २३ तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षापासून माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज सकाळी भाजपाला सोडचिठ्ठी देत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी दिली. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला …
Read More »ओबीसी आरक्षणाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ही ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळावा कार्यक्रमात
मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जातोय. मात्र धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. ओबीसीचे …
Read More »केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केल्या या सूचना केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर कराव्या लागणार –मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी कृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या अधिक मजबूत कराव्यात, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे पाहून हमी भावाचे संरक्षण काढून घेऊ नये, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिकचे कायदे करावे, करार शेतीमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे, हमी भावापेक्षा कमी किमतीत कोणाला शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी, …
Read More »जयंत पाटील म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढलेय गंगाखेडचे माजी आमदार व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंगचे प्रमाण वाढले असून परभणी जिल्ह्यातील माजी आमदार सिताराम घनदाट यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार …
Read More »राज्यपाल कोश्यारींनी जलसंपदा मंत्र्यांना दिले आदेश पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या व प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा
मुंबई : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधीव्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा या मागणीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्यातील पाच हजार कोटी रूपयांवरील प्रकल्प जे पूर्णत्वाकडे पोहचले आहेत, त्याचबरोबर पर्यावरण परवानगी किंवा इतर काही कारणांसाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती सादर …
Read More »आजी काळजी करू नका… दोन तीन दिवसात बर्या व्हाल; ९० वर्षांच्या आजीला दिला धीर कोरोना वॉर्डमध्ये जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रुग्णांची केली विचारपूस
सांगली: प्रतिनिधी “आता कसं वाटतंय आजी …. काही काळजी करू नका… दोन – तीन दिवसात बर्या व्हाल…” असा धीराचा शब्द सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजीला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज …
Read More »कॅग’च्या अहवालाने जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची फडणवीसांवर टीका
मुंबई : प्रतिनिधी कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॅग’च्या अहवालावरून फडणवीसांवर टीका केली. ‘कॅग’चा अहवालही सांगतो की, भाजपच्या सर्व आश्वासनांप्रमाणे जलयुक्त शिवार योजनाही ‘मुंगेरीलाल के हँसीन सपने’सारखीच ठरली आहे. विरोधी पक्षात असताना जलयुक्त शिवार योजना उपयुक्त …
Read More »मराठीतील या दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष …
Read More »
Marathi e-Batmya