जयंत पाटील म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढलेय गंगाखेडचे माजी आमदार व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंगचे प्रमाण वाढले असून परभणी जिल्ह्यातील माजी आमदार सिताराम घनदाट यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार बाबाजानी दुर्राणी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, चिटणीस संजय बोरगे , युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण माजी आमदार विजय भांबळे आदी उपस्थित होते.

गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य परभणी व अभ्युदय बँकचे संचालक भरत घनदाट , माधव ठवरे, लालया पठाण, अमित घनदाट, गणेश काळे, गौतम हत्तीअंबिरे, मधुसूदन लापटे, चेअरमन जाधव, विनायक राठोड, दत्ताराव भोसले, दयानंद कदम, तुळशीराम शिंदे, विठ्ठल टोपे, डी. के. पाटील, विजयकुमार शिंदे, रावसाहेब शिंदे, शेखभाई चाऊस, शेख मुस्ताफा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अंडरवर्ल्डच्या धमक्या व हल्यांमुळे बॉलिवूड प्रचंड दहशतीखाली, बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र साबरमतीच्या जेलमध्ये बसून गुंड चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील तर पोलीस यंत्रणा व भाजपा सरकार काय करते?

मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *