Tag Archives: jayant patil

औरंगाबादेत ऑफर नंदुरबारमध्ये सोबत? की कात्रजचा घाट… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक क्लृपत्या लढविल्यानंतर अखेर शांत झालेल्या भाजपाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे वक्तव्य भाजपाच्या दोन मंत्र्यांकडे बघत केले आणि भाजपात हर्षोल्लासाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र त्यास २४ तासाचा अवधी लोटत नाही तोच …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या “भावी सहकारी” आणि “डाव्हर्जन” वर मुख्यमंत्र्यांसह कोण काय म्हणाले ? भाजपा मंत्र्याकडे पाहून मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आपल्या भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व आजी-माजी आणि भावी सहकाऱी असा उल्लेख करत राजकिय वर्तुळात उत्सुकता वाढवत दुसऱ्याच क्षणाला म्हणाले की मला रेल्वे फार आवडते, रेल्वेचे एक बराय त्याला रूळ असतात, त्यामुळे ती इकडे-तिकडे जावू शकत नाही. …

Read More »

चळवळ नाहीशी करणाऱ्या प्रवृत्तींना नाहीसे केले पाहिजे सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य होणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकविसाव्या शतकातील सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेणे, या क्षेत्रातील उणिवा …

Read More »

शरद पवारांनी बोलाविलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा विद्यमान आमदारांमध्ये कामे होत नसल्यावरून नाराजी

मुंबईः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असल्या तरी त्या निवडणूका फार काळ लांबविता येणार नाही. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जर तातडीने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागला तर ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती या बैठकीस उपस्थित …

Read More »

चिखलातून… मोटारसायकलवरुन प्रवास करत पाझर तलावाची पाटलांनी केली पाहणी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य; जयंत पाटलांचे आश्वासन

चाळीसगांव : प्रतिनिधी फुटलेल्या पाझर तलावाकडे जाण्यासाठी मोठा रस्ता नसताना चक्क कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवरुन तीन किलोमीटरचा प्रवास करत आणि चिखल तुडवत अतिवृष्टीने फुटलेल्या बिलदरी पाझर तलावाची आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्याचे जलसंपदा …

Read More »

परब यांच्या नोटीसप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मलिक यांचे भाजपावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना ईडीने पाठविलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात जे काही घडतंय ते …

Read More »

बैलगाडी शर्यतींबाबत महिनाभरात मार्ग काढणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन …

Read More »

राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य समजावे लागेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान …

Read More »

अनाथांना आरक्षणासह या महत्वाच्या प्रश्नी राज्य मत्रिमंडळाने घेतले हे निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली बैठक

मुंबई: प्रतिनिधी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देताना याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह उलपब्ध करण्याच्या धोरणातही बदल करत दुय्यम आणि मुद्रांक निरिक्षक पदे लोकसेवा आयोगा मार्फत भरण्याच्या निर्णयासह काही महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. ते निर्णय …

Read More »

राज्याच्या जीएसटी विभागाचा अजब कारभार: २०० कोटींचा चुना लावणाऱ्यांची बदली आधीची कामगिरी, सीआर न तपासताच बदलीसाठी शिफारस

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत असून महसूली उत्पन्नाची वाणवा भेडसावत आहे. त्यातच राज्याच्या जीएसटी विभागातील एकाने चक्क तीन वर्षात २०० कोटी रूपयांचा सरकारलाच चुना लावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाची बक्षिसी म्हणून चक्क जीएसटी विभागाने या संबधित इन्फोर्समेंट ऑफिसर अर्थात …

Read More »