Tag Archives: ncp

आंबेडकरवादी प्रा. सुषमा अंधारे बनल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक जाहीर

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात आंबेडकरवादी प्राध्यापिका सुषमा अंधारे यांचे नाव समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याबरोबरच शरद पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांची नावे स्टार प्रचारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकीत पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी व …

Read More »

मोदींना रोखण्यासाठी ज्यांना मदत करायचीय तेच भाजपात येतायत भाजपच्या वरीष्ठ नेत्याची उद्विग्नता

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा एकहाती विजय मिळल्यावर पंतप्रधान पदी हुकूमशाही पध्दतीने वागणाऱे नरेंद्र मोदी यांची वर्णी लागू नये यासाठी पुरोगामी विचाराच्या पक्षांना मदत करण्याची भूमिका पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येत आहे. परंतु पुरोगामी पक्षातीलच नेते आता पक्षात येत असल्याने मोदींना रोखण्यासाठी कोणाला मदत करायची असा उद्विग्न सवाल …

Read More »

भाजपच्या मदतीसाठीच दाऊदची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतित्तुर

मुंबईः प्रतिनिधी भाजपला मदत करण्यासाठी वारंवार ही चर्चा समोर आणली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊदला परत आणण्यास विरोध केल्याचे वक्तव्य केले. याचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला. …

Read More »

सुजय पाठोपाठ पिता विखे-पाटील आणि गोरेही कमळ हातात घेणार मोहीते-पाटील पितापुत्रांचा दोन दिवसांच्या अंतराने भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभेची राजकिय गणिते डोळ्यासमोर ठेवत लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण भाजपचे कमळ हातात घेत आहेत. यात सुजय विखे-पाटील यांचे पिताश्री विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असून काँग्रेसचे जयकुमार गोरे हेही हातात कमळ घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे सुपुत्र …

Read More »

वंचित आघाडीची स्थापना भाजपच्या पराभवासाठी की विजयासाठी ? आंबेडकरांच्या विरोधातील वाढत्या नाराजीने वंचित आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्रित करण्याच्या हालचाली सुरु असतानाच भाजपबरोबरच, काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही विरोध करत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना केली. परंतु त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या राजकारणावर वंचित आघाडीतील सहकाऱ्यांकडून संशय व्यक्त करत आंबेडकरांच्या विरोधात नाराजीचा सुर वाढत असून ही आघाडी …

Read More »

यंदा भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राकाँला मतदान करू नका ओबीसी समाज बांधवांना संघटनेचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यात जातीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांवर अन्याय झाला असून मराठा आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाने मतदान करू नका असे आवाहन महाराष्ट्र इतर मागासर्गीय संघटनेचे अध्यक्ष श्रावण देवरे यांनी केले. …

Read More »

भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ ची सोशल मिडीयावर टींगल-टवाळी सोशल मिडीयातील ट्वीटर, व्हॉट्सअपवरून लघुकथा आणि उपरोधिक टोल्यांना महापुर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’ चा आरोप केला. मात्र या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ची घोषणा करत चौकीदार हा शब्द नावाआधी वापरण्यास सुरुवात केली. मात्र सोशल …

Read More »

मुंबई लोकल व रेल्वे सर्कलवर सव्वालाख कोटी खर्च करा मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची शरद पवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी दिवसेंदिवस रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे असे सांगतानाच बुलेट ट्रेनपेक्षा मुंबईतील रेल्वे पुल आणि मुंबई लोकलची अवस्था सुधारावी अशी मागणी आता बुलेट ट्रेन होणार आहे. यावर सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे. आमचे सर्वांचे मत आहे की, सरकारने तो पैसा मुंबई लोकल …

Read More »

पार्थ पवार, डॉ.अमोल कोल्हे यांची उमेदवारी अखेर जाहीर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी १२ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा ५ उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी ही यादी जाहीर केली. यामध्ये दिंडोरी- धनराज महाले, नाशिक- समीर भुजबळ, शिरुर- डॉ अमोल कोल्हे, बीड – बजरंग सोनवणे, मावळ- पार्थ पवार या नावांची घोषणा केली. …

Read More »

सीएसएमटी दुर्घटनेतील पीडीतांच्या घरातील व्यक्तीला नोकरीत घ्या काही लाखाच्या मदतीने त्यांचे काही होणार नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भावना

मुंबईः प्रतिनिधी कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. …

Read More »