यंदा भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राकाँला मतदान करू नका ओबीसी समाज बांधवांना संघटनेचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात जातीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांवर अन्याय झाला असून मराठा आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाने मतदान करू नका असे आवाहन महाराष्ट्र इतर मागासर्गीय संघटनेचे अध्यक्ष श्रावण देवरे यांनी केले.
देशात लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून आजपासून ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाल्याच्या यापार्श्वभूमीवर ते बोलत होते.
इतर मागासवर्गीय समाज हा देशात ५२ टक्के आहे, त्यांच्या तुलनेत त्यांना सरसकट आरक्षण दिले जात नाही. केंद्रीय स्तरावर इतर मागासवर्गीयांना स्वतंत्र गट करण्यात आला नाही. त्यांना SEBC म्हणूनच समाविष्ट केले जाते. आता मराठा समाजाला ही SEBC मध्ये समाविष्ट करून १६ टक्के आरक्षण दिले जात आहे. त्याचा थेट परिणाम ओबीसींच्या आरक्षणावर होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
तर दुसरीकडे सरकार छुप्या पद्धतीने ओबीसी समाजाला लागू असलेल्या २७ टक्के आरक्षणाची गरज आहे काय? यासंदर्भात विविध याचिका दाखल करण्यात येत आहेत. या विरोधात न्यायालयीन लढाई लढावी लागेल. तत्पूर्वी लोकशाही मार्गाने अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य मागास आयोगाने केलेल्या शिफारसी आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *