मराठी ई-बातम्या टीम राज्यातील प्रसिध्द किर्तनकार तथा वारकरी चळवळीचे प्रमुख बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात दोन दिवसात त्यांच्या वक्तव्यप्रकरणी कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या …
Read More »भाजपात फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे संघर्ष संपुष्टात? मुंडेकडून चक्क कौतुक भरसभेत फडणवीसांच्या कौतुक आणि सल्ला दिल्याची कबुलीही
मराठी ई-बातम्या टीम मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यापासून भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे असा संघर्ष असल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. त्यानंतर आज एकदम मुंडे यांनी …
Read More »पंकजा मुंडेंचा इशारा: ठाकरे सरकार, ओबीसींची फसवणूक थांबवा राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी साडेचारशे कोटींची मदत द्या
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळे गमावले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरुपात मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक साडेचारशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी …
Read More »ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाचे चक्काजाम आंदोलन ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही
राज्यभरातून: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी झालेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री …
Read More »ओबीसी आरक्षण फडणवीसांनी वाचविले तर आघाडीने घालविले राज्य सरकार विरोधात २६ ला राज्यव्यापी आंदोलन - पंकजा मुंडे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ …
Read More »काँग्रेस, भाजपाच्या विरोधानंतरही ओबीसींच्या त्या रिक्त जागांसाठी निवडणूका १९ जुलै २०२१ रोजी मतदान; तर २० जुलै २०२१ रोजी निकाल-राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूरमधील ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांवरील सदस्यांच्या निवडणूकीसाठी असलेले ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरले. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांसाठी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या रिक्त जागांसाठी निवडणूका न घेण्याचे आव्हान केले. …
Read More »ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …
Read More »ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आता शासकीय वसतीगृह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात असलेल्या साखर कारखान्यांच्या हद्दीतील ऊसांची तोडणी करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकिय वसतीगृह योजना सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे शिक्षण आता विना व्यत्यय सुरु राहण्यास मदत होणार आहे. पहिल्या …
Read More »धक्कादायक: बलात्काराची तक्रार केलेल्या महिलेलाच ग्रामपंचायतीने काढले गावाबाहेर भाजपाच्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी
मुंबई : प्रतिनिधी साधारणत: पाच वर्षापुर्वीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेने आरोपींविरोधात निकराचा लढा देतं त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला याचा राग धरून ग्रामपंचायतीने या महिलेलाच गावाबाहेर काढण्याचा ठराव केल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील पाचेगावात घडल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली असून सदर ग्रामपंचायती विरोधात कारवाई …
Read More »शरद पवार, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली हि ग्वाही स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाला बळकटी देणार
पुणे : प्रतिनिधी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत …
Read More »
Marathi e-Batmya