भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री तथा स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज ३ जून रोजी नववा स्मृतिदिन. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर गेले. तेव्हा भाजपाच्या नेत्या, पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. यावेळी खडसे आणि मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर …
Read More »अखेर या गोष्टीसाठी मुंडे भाऊ-बहिण आले एकत्र मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याने वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
बीड जिल्ह्यातील राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीने जिल्ह्यातील राजकारणात प्रथमच एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाल्यानंतर पुन्हा बहिण-भावामध्ये कोण बाजी मारणार अशी चर्चा सुरु असतानाच अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली. …
Read More »पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…. विपर्यास मी भाजपाची, पण भाजपा माझा नाही
पंकजा मुंडे, भाजपा माझ्या पाठीशी आहे असंच म्हणाल्या मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केले. मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडीच माझा आहे’, असे जाहीर वक्तव्य करून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला उद्ग्वेद व्यक्त केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले. त्यानंतर …
Read More »एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगत म्हणाले ,पंकजा सोबतही हेच घडतयं स्व.गोपीनाथ मुंडे यांचा भाजपाकडून छळ होत होता
राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत परळी येथून माजी मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सातत्याने पंकजा मुंडे यांना सातत्याने भाजपाकडून डावलण्यात आल्याचे दिसून येत आले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आता आपण कोणासमोर झुकणार नाही असे वक्तव्य करत पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला. मात्र …
Read More »पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या आक्रमतेपणावर सध्या झाकण, पण…. कोणापुढे झुकणार नाही वक्तव्य करत इशारा
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज१८ मार्च रोजी पार पडले. या कार्यक्रमाला राज्यातल्या तसेच केंद्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या …
Read More »छगन भुजबळ भावनिक होत म्हणाले, माझा धाकटा भाऊ स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर मी… लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार
स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या …
Read More »स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला फडणवीसांची पाठ मात्र गडकरी, मुख्यमंत्री हजर नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न
भाजपाचे नेते तथा केंद्रीय कृषीमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण नाशिक येथील नांदूर शिंगोटे येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या उपस्थितीत करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही
राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …
Read More »भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी केला एकत्र प्रवास, दिले हे कारण नाशिकमधील भाजपा प्रदेश कार्यक्रमाच्या निमित्ताने केला प्रवास
अलीकडच्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनी गैरहजरी लावली होती. अशातच आज ११ फेब्रुवारी रोजी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी एका कारमधून प्रवास केला. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. भाजपाची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरु …
Read More »भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली कबुली, पंकजा मुंडेंने बदनामी करणारे पक्षातच.. बीडमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मुंडे यांच्या पराभवामागे कोण याविषयीच्या चर्चेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणूकीत आणि सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत राहील्या. मात्र पंकजा मुंडे यांचे नाव प्रत्येकवेळी डावलण्यात …
Read More »
Marathi e-Batmya