भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच, पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला …
Read More »राष्ट्रवादी म्हणते, राज ठाकरेंची उंची शरद पवारांच्या नखाऐवढी… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला
औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे कोणाला लक्ष्य करणार काय बोलणार याबाबतची उस्तुकता राजकिय वर्तुळात निर्माण झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर एका चकार शब्दाने न बोलता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील जाती-पातींमध्ये द्वेषाचे राजकारण सुरु केल्याचा आरोप …
Read More »संजय राऊतांचा इशारा, दोन घाव बसले की पाणी मागणार नाही… मनसे भाजपाला दिला इशारा
आतापर्यंत आम्ही आमच्याकडे सत्ता असल्यानं आणि आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण पाणी डोक्यावरून जात आहे. त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावे लागेल, मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. आम्हाला लढण्यासाठी भाडोत्री लोक देखील लागत नाही. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच …
Read More »संजय राऊत म्हणाले, कुणी कितीही शाली पांघरा, हिंदू हृदयसम्राट एकच शालीवरून मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र
महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत आयोजित सभेसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे पोहोचले असताना. त्यांच्या पुणे ते औरंगबाद प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी राज ठाकरे यांना भगवी शाल पांघरत कार्यकर्त्यांनी सन्मानित केले. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट एकच आहेत. देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदूहृदयसम्राट …
Read More »अजित पवार म्हणाले, …विरोधात प्रचारसभा घेणाऱ्यांनी उलटी प्लेट लावली मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली टीका
मागील दोन वर्षे करोना महामारीचे संकट सोसल्यानंतर त्यातून बाहेर पडत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं असताना काहीजण अचानकपणे भोंग्याचे राजकारण करून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात राज्यभर प्रचारसभा घेणाऱ्यांनी आता उलटी प्लेट …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हिंदूं मध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपाची चाल
शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुखांशी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज संवाद साधत शिवसेनेने केलेली कामे लोकांपर्यत न्या असे आवाहन करत येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असल्याचे सांगत मी तुमच्याबरोबर फिरण्यासाठीच धोके पत्करून माझ्यावरील शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. शिवसेनापक्षप्रमुख उध्दवसाहेब …
Read More »राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करणाऱ्यास एक लाखाचा दंड औरंगाबाद उच्च न्यायालयाने याचिका लावली फेटाळून
हनुमान जयंती दिवशी पुण्यात हनुमान मंदिरात जावून महाआरती केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत जाहिर सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विविध राजकिय पक्षांकडून सामाजिक संघटनांकडून राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत सभेला परवानगी देवू नका अशी मागणी केली. राज ठाकरे यांच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करावी …
Read More »जयंत पाटील म्हणाले, त्यांचे बंधु मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते… गुजरातचे कौतुक केले आता उत्तर प्रदेशचे करतायत
जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीचे कौतुक केले आहे असा प्रश्न …
Read More »गानसम्राज्ञीला “अखेरचा हा दंडवत” पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी
मराठी ई-बातम्या टीम सुरेल आवाज आणि आपल्या कल्पक शैलीमुळे तमाम संगीतरसिकांना गाणे, संगीतातून मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मुंबईकरांसह देशातील जनतेने संध्याकाळी ७.१० च्या सुमारास शिवाजी पार्क येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या चितेला मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी …
Read More »मुंबईसह राज्यातील सर्वच दुकानांच्या पाट्या आता मराठीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी असली तरी राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात याबाबत राज्य सरकारकडून आग्रही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्यावरून कधी शिवसेना तर कधी मनसेकडून मुंबईसह राज्यातील सर्व ठिकाणी असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठी अक्षरात असाव्यात याबाबत आग्रह धरण्यात येत होता. तसेच यासंदर्भात मनसे आणि शिवसेनेकडून वेळोवेळई …
Read More »
Marathi e-Batmya