आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी बॉम्बेच्या समोर तीव्र आंदोलन केले. साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई निष्पक्ष व पारदर्शी करावी आणि साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असलेले प्राध्यापक सुर्यनारायण डुल्ला यांना सेवेतून बरखास्त करावे, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांनी केली.

झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज आयआयटी बॉम्बे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत साहिल वाकोडेला न्याय मिळावा अशी आग्रही मागणी केली. जब जब सरकार डरती, है पुलीस को आगे करती है, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. पोलिसांनी यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून पोलीस स्टेशनला रवानगी केली.

यावेळी बोलताना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, साहिल वाकोडेच्या आत्महत्या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १८ मागण्या केल्या असून या सर्व मागण्यांना युवक काँग्रेसचा पाठिंबा आहे. साहिल वाकोडे आत्महत्येचा सखोल तपास करतानाच आयआयटी बॉम्बे  येथील जाति-आधारित छळाच्या आरोपांचीही चौकशी करण्यात यावी. कारण यापूर्वीही या संस्थेमध्ये शिकणा-या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे संस्थात्मक उत्तरदायित्व, निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग, मानसिक आरोग्य व समुपदेशनासाठी अधिक भक्कम आधार, तक्रार निवारणाची प्रभावी यंत्रणा या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत त्या सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणीही केली.

About Editor

Check Also

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *