पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यामध्ये वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आंतर्वासिता निर्वाह भत्यात सात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी अकरा हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जात असे आता तो अठरा हजार रुपये होईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सालयात एक वर्षासाठी आंतर्वासिता पशुवैद्यक म्हणून काम करणे अनिवार्य असते. या कालावधीत त्यांच्या निवास, भोजन आणि प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चापोटी अकरा हजार रुपये दिले जात असत. पण आता त्यांना दरमहा अठरा हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी पंधरा हजार रुपये राज्य शासन देणार आहे. उर्वरित तीन हजार रुपये भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या निधीमधून देण्यात येणार आहे. अनुसंधान परिषद केवळ सहा महिन्यासाठी निधी देते. त्यापुढील सहा महिन्याचा निधी देण्यासाठी विद्यापीठाच्या स्वनिधीमधून खर्च करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयाच्या ठिकाणी सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याने पशुधनाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना, पशुपालकांना मदत होणार आहे.

About Editor

Check Also

सतेज पाटील यांची माहिती, गोकुळमध्ये सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर माजी सरन्यायाधीशांनी दिला होता कायदेशीर सल्ला

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *