Tag Archives: union home minister

अमित शाह यांचे आश्वासन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू 'स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल

कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय …

Read More »

गृह मंत्रालयाचे आदेश, सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिलचा सराव करवून घ्या नागरिकांना बचावाचे आणि नागरी संरक्षणासाठीही करा

गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गृह मंत्रालयाने (एमएचए) अनेक राज्यांना ७ मे (बुधवार) रोजी प्रभावी नागरी संरक्षणासाठी अर्थात मॉक ड्रिलचा सराव करण्यास सांगितले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉक ड्रिल सरावा दरम्यान, हवाई हल्ल्याचे इशारा देणारे सायरन सक्रिय …

Read More »

रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित …

Read More »

कर्मठ आणि अभ्यासू म्हणणारे फडणवीस यांच्या वक्तव्याचा अमित शाह यांच्याकडूनच त्रिफाळा तिलक महाराज कोण, शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरु केली? अमित शाह यांना यांना अचूक माहिती द्या

फार पूर्वी २०१४ पूर्वीच्या कोणी एके काळी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आणि भारत देशावरही होती. परंतु सत्ता राखण्यासाठी आणि जातीय समिकरणं कायम राखण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतल्याची चर्चा कधी ऐकिवात नाही. पण सध्या महाराष्ट्रात आणि भारताच्या केंद्रातील सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून खोट्या माहितीचा प्रचार सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी …

Read More »

अमित शाह यांचे आश्वासन, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणाऱ्यांवर कारवाई संसदेत इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक बिलावर बोलताना केले स्पष्टीकरण

पर्यटक म्हणून किंवा शिक्षण, आरोग्यसेवा आणि व्यवसायासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे, परंतु देशाला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (२७ मार्च २०२५) दिले. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, मुख्य मुद्दा असा आहे की स्थलांतर हा एक वेगळा विषय …

Read More »

ईशान्य भारतात ८८ कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्तः अमित शाह यांचे कडक कारवाईचे आदेश चार जणांना चारचाकी वाहनासह अटक, एनसीबीकडून चौकशीला सुरुवात

ईशान्य भारतात ८८ कोटी रूपये किंमतीचे ड्रग्ज सापडले असून या ड्रग्ज प्रकरणात कोणालाही मोकळे सोडू नका असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिले. आसामच्या इंफाळ आणि गुवाहाटी झोनमध्ये “८८ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइन टॅब्लेटच्या मोठ्या प्रमाणात खेपा” प्रकरणी “आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेल” मध्ये सहभागी असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली …

Read More »

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनः चार जखमी कामगारांचा मृत्यू बीआरओच्या छावणीवर हिमस्खलन, लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत

उत्तराखंडमधील बद्रीनाथमधील माना गावाजवळील उंचावरील सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) छावणीवर हिमस्खलन झाल्यानंतर, लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान चार जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने शनिवारी दिली. उर्वरित पाच कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे काम सध्या सुरू आहे. सुटका केलेल्या कामगारांना गंभीर आरोग्यसेवेसाठी जोशीमठ येथे नेण्यासाठी एकूण …

Read More »

सिद्धरामय्या यांचा पलटवार, अमित शाह यांचे डिलीमिटेशन बाबतचे ते वक्तव्य विश्वसनीय नाही डिलीमिटेशनच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर केली टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डिलीमिटेशन संदर्भातील वक्तव्यावर जोरदार टीका केली आणि ते “विश्वसनीय नाही” आणि “दक्षिणेकडील राज्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा उद्देश आहे” असल्याचा आरोप केला. आगामी डिलीमिटेशन प्रक्रियेत दक्षिणेकडील राज्यांशी अन्याय्य वागणूक दिली जाणार नाही या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दाव्याला कर्नाटाकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

अमित शाह यांचे प्रत्युत्तर, एकही संसदीय जागा गमावणार नाही एम के स्टॅलिन यांनी टांगती तलवार म्हणून केली होती टीका

डिलीमीटेश प्रश्नावरून तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना  गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सांगितले की, सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्ये एकही संसदीय जागा गमावणार नाहीत. कोइम्बतूर, तिरुवन्नमलाई आणि रामनाथपुरम येथील पक्ष कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “आज सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्यांना त्रास होऊ नये यासाठी …

Read More »

कर्जदाराची रेटींगला परवानगी घेण्याची गरज नाही आरबीआयची न्यायालयात माहिती सीबील स्कोअर क्रेडिट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विचारणेनंतर आरबीआयचा खुलासा

क्रेडिट रेटिंग कंपन्यांनी क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी बँकिंग वापरकर्त्यांचा आर्थिक डेटा गोळा करण्याच्या पद्धतीचा आरबीआयने बचाव केला आणि सर्वोच्च न्यायालयात सादर केले की संसदेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (नियमन) कायदा, २००५ लागू करण्यामागील नेमका उद्देश हाच होता आणि कंपन्यांना यासाठी कर्जदारांच्या संमतीची आवश्यकता नाही. बेंगळुरू येथील उद्योजक आणि शैक्षणिक प्रशिक्षणार्थी असलेले …

Read More »