१० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक/ प्राचार्यांचा शिक्का देणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. हॉल तिकीटामध्ये विषय व माध्यम बदल, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्वरीत शाळेस/महाविद्यालयास कळवावे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी सांगितले.

About Editor

Check Also

Sawan Barwal won a medal for the country in the men's marathon at the Asian Games after 44 years.

Asian Games: ४४ वर्षांनंतर सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारतासाठी रौप्य पदक पटकावले

नागोया : भारताच्या सावन बरवालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत Asian Games पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *