अतिवृष्टीमुळे गैरहजर उमेदवारांकरिता १३ जुलैला टंकलेखन कौशल्य चाचणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ८ जुलै २०२४ रोजी आयोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आता १३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

८ जुलै, २०२४ रोजी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनांवर परिणाम झाला होता. परिणामी या दिवशी चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहता यावे याकरिता चारही सत्रांची कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशिराने सुरु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. तरीही अतिवृष्टीमुळे अनेक उमेदवारांना चाचणीसाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे ८ जुलै, २०२४ रोजी मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना संधी देण्याच्या दृष्टीने टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी १३ जुलै, २०२४ रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयोजित करण्यात येणार आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहीत करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील प्रवेशप्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार असून, सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांचे मोठे धाडस, ट्रॅफीक सिग्नल बसविण्यासाठी भूमिपूजन वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड ९७ मधील सरस्वती रोड आणि टागोर रोड

ट्रॅफिक सिग्नलमुळे लोकांना वर्दळीच्या चौकातून रस्ता ओलांडणे सोपे होते. बागेतील बाक बसण्यासाठी जागा देतात, तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *