मंत्री राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात दलित सरपंचाच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी गेले असता कारवाई

आझमगड-मुंबई: प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली.

यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ. राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली असून त्यांना नजरकैद केले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आडमुठे धोरणाला न जुमानता डॉ.नितीन राऊत त्या ठिकाणी रस्त्यावर खाली बसून शांततेच्या मार्गाने ह्या कृत्याचा विरोध केला.

About Editor

Check Also

महिलांचा ऑनलाइन लैंगिक छळ महागात पडणार दोषींना तीन वर्षांचा तुरुंगवास

राज्यात महिलांवरील वाढत्या ऑनलाइन लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना केल्या आहेत. विधानमंडळाच्या दोन्ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *