आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र शिवसैनिक सर्वात मोठा हेच आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरून अधोरेखित झालं आहे. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. पोलिसांनी या शिवसैनिकांना सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

सदा सरवणकरच्या विरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्यांना जेव्हा पोलिसांनी सोडलं त्यानंतर हे सर्व शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या शिवसैनिकांचं कौतुक केलं. दरम्यान, आदित्य ठाकरे स्वतः जमिनीवर बसत या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला दिलं. शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना हा एक परिवार आहे हेच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या या कृतीतून दाखवून दिलं.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा विकासकामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरा-मोहरा बदलणार विविध विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *