सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोक शाहरूख खानवर जळतात.. पठाण चित्रपटावरून सध्या सुरु असलेल्या वादावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तत्पूर्वी या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकनीवरून वाद निर्माण करत बॉयकॉट पठाण चळवळ काही जणांकडून सुरु करण्याचा प्रयत्न केला. तरीही पठाण प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या ती दिवसात या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली. जगभरात आतापर्यंत ‘पठाण’ने ३०० कोटी रुपये कमावले आहेत. सध्या ‘पठाण’चं सर्वत्र कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.

‘Unfiltered By Samdish’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ‘पठाण’ चित्रपट तसेच शाहरुख व दीपिकाबाबत भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शाहरुख खान भारताचा सुपरस्टार आहे. तो त्या चित्रपटात (पठाण) अगदी चांगला दिसत आहे. तो व दीपिका एकत्र अगदी छान दिसत आहेत. मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात असे वक्तव्य केले.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रासारख्या राजकारण्यांनी ‘पठाण’ला केलेल्या विरोधाचं तुम्ही समर्थन करता का? असे सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या, अजिबात नाही. मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी अशावेळी त्या व्यक्तींना फोन करेन. त्यांना विचारेन की, भाऊ तुला काय झालं आहे?

आपण अशा विषयांवर चर्चा का करतो? अरुण जेटली म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद केलं तर लोक बोलणं बंद करतील. कधी कधी मला अरुणजी यांचं हे वाक्य पटतं असेही त्या म्हणाल्या.

About Editor

Check Also

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने नवी नियमावली

नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने   सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून नियमावलीचा मसूदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *