सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज राज्यातील ४८ मतदार संघात ४ जूनला मतमोजणी

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण

१४५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *