अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड...

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.

या जाहीरनामा समितीमधील सदस्य खालीलप्रमाणे : कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नायकवडी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, रुपालीताई ठोंबरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नजीब मुल्ला, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्कीन आदींचा समावेश आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पुण्यात न्यायालयाच्या दारात अराजकतेचा कळस, महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का? कोकणातील रासायनिक प्रकल्पांमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी, कोकणचा विकास करणारे व रोजगार देणारे प्रकल्प हवे विनाश करणारे नाही

न्यायालयाच्या दारात गोळीबार होतो हे अराजकतेचे लक्षण असून गुन्हेगारांना कायद्याचे वा पोलिसांचे काही भय राहिलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *