शेवटी देवेंद्र फडणवीस पोहचले एकनाथ शिंदे यांच्या दरबारात भेट टाळण्याच्या नादात अखेर देवेंद्र फडणवीसच पोहोचले वर्षा निवासस्थानी

सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी म्हणाव्या तशा जमल्यानसल्याने काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांना भेटण्याचे मागील सहा दिवसांपासून टाळत होते. परंतु आता राज्यातील सत्ता स्थापनेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना अखेर भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी यावे लागल्याचे आज दिसून आले.

मागील काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने सातारा येथील दरे या गावी दिल्लीहून थेट गेले. त्यानंतर तेथे तीन दिवस होते. त्या काळात तेथे कोणाच्याच गाठीभेटी आणि फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला नाही. किंवा ज्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशीही संपर्क होऊ दिला नाही. अखेर एकनाथ शिंदे राजकिय परिस्थिती पाहता अखेर दरे यागावाहून पुन्हा ठाण्यात आल्यानंतरही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना फोन करणे टाळले किंवा भेटीच्या प्रश्नी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही.

अखेर माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दूत असलेले आणी माजी मंत्री गिरिष महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाणे येथील त्यांच्या घरी पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी करत राजकिय घडामोडीवर चर्चा केली. मात्र त्याबाबत भेटीनंतर गिरिष महाजन यांनी स्पष्टपणे सांगण्यास नकार देत ही भेट फक्त त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगत त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्याबाबत पुढील चर्चा होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त नियोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी ११ वाजता वर्षा या शासकिय निवासस्थानी पोहोचणार होते. मात्र त्यांच्या तब्येतीत पुन्हा फरक पडाल्याचे दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात त्यांच्या प्रकृतीच्या चाचण्या करण्यात आल्या. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे येणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिना निमित्त आयोजित बैठक ऑनलाईन घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट होता होता राहुन गेली.

अखेर संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी भाजपा नेते तथा औट घटकेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेत वर्षा या शासकिय निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर या दोघांमधील चर्चेचा तपशील काही पुढे येऊ शकला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीसाठी एकमेकांना टाळणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी अखेर फडणीस यांनाच एकनाथ शिंदे यांच्या घरी जावे जावे लागले.

About Editor

Check Also

डॉ श्रीकांत शिंदे यांचे थेट आव्हान, खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेनंतर दिले आव्हान

“जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा किंवा हवे त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *