सचिन सावंत यांचा सवाल, १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत दाखवा स्वप्नांचे व्यापारी देवेंद्र फडणवीस- दुबई सारखे शहर बनवण्याआधी १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत ते दाखवा

काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी म्हणाले की दोन वर्षांमध्ये भारतात अमेरिकेसारखे रस्ते होतील. आता मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी म्हणतात की एमएमआर मध्ये दुबई पेक्षा मोठे सुंदर शहर वसवू. भाजपा नेत्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातील ९०% जनतेने ना अमेरिका पाहिली ना दुबई! त्यामुळे या जनतेची दिशाभूल करणे, त्यांना स्वप्ने दाखवणे भाजपा नेत्यांना सोपे वाटते असा खोचक टोला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक्सवर ट्विट करत लगावला.

सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दुबईसारखे शहर वसविण्याच्या बाता मारण्याआधी १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत? ते दाखवावे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी वर्षा ते मुंबई एअरपोर्ट हा प्रवास करताना ज्या उंचसखल, विवर युक्त रस्त्याने जाता तो ज्या स्पेस टेक्नॉलॉजीने बनला आहे ती टेक्नॉलॉजी अमेरिका किंवा दुबईत कुठे वापरली जाते? ते ही सांगावे. आणि हो! महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेप्रमाणे मुख्यमंत्री अमेरिका आणि दुबई दर्शन योजना सुरू करावी जेणेकरून जनतेला अमेरिकेतील रस्ते आणि दुबई शहर पाहून मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली हसीन स्वप्ने पाहणे सुकर होईल असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मंत्र्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास लाज वाटते का ? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनी आधी काटकसर करावी व मग दुस-यांना उपदेश द्यावे. परदेश प्रवास टाळा म्हणणारेच परदेश दौऱ्यावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डीजल वापर कमी करणे तसेच मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *