सुनिल तटकरे यांची माहिती, राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्हयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत शिवाय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

दरम्यान शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या दु:खाच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगतानाच आगामी काळात आणखीही मदत व दिलासा देणार्‍या उपाययोजना जाहीर करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पुण्यात न्यायालयाच्या दारात अराजकतेचा कळस, महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का? कोकणातील रासायनिक प्रकल्पांमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी, कोकणचा विकास करणारे व रोजगार देणारे प्रकल्प हवे विनाश करणारे नाही

न्यायालयाच्या दारात गोळीबार होतो हे अराजकतेचे लक्षण असून गुन्हेगारांना कायद्याचे वा पोलिसांचे काही भय राहिलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *