मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत

मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली नाहीत. ती राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा ही मतदान यंत्र वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

मोहोळ तालुक्यातील २२० मतदान केंद्रांवर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर काही राखीव मतदान यंत्र तात्काळ सुरक्षा कक्षात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला. कुरूल (५५) गटातील काही मतदान केंद्रांसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील ०२ कंट्रोल युनिट व ०२ बॅलेट युनिट यासंदर्भात हा प्रकार घडला.

दरम्यान, ही मतदान यंत्रे एका वाहनातून खासगी ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला व ही मतदान यंत्रे राखीव स्वरूपातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर मतदान यंत्रे शासनाच्या सुरक्षा कक्षात सीलबंद करण्यात आली आहेत.

About Editor

Check Also

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले, तर जगभरातील हिंदू बांग्लादेशातील हिंदूना मदत करतील पुन्हा एकदा हिंदूत्वाचा नारा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी संकटग्रस्त बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीवर एक स्पष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *