काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये गुरुवार पासून कार्यशाळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यासह ज्येष्ठ नेते व तज्ञ मार्गदर्शन करणार.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी दोन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यशाळा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उद्या गुरुवारी १२ मार्च रोजी श्रीचंद्र गार्डन लॉन्स येथे होणार असून १३ मार्चला कार्यशाळेची सांगता होणार आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, माजी मंत्री वसंत पुरके यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते व विविध विषयातील तज्ज्ञ यावेळी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.

शेवटी बोलताना हर्षवर्धऩ सपकाळ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने ही लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याआधी २७ फेब्रुवारी ते १ मार्च असे तीन दिवस कोकण विभागासाठी चिपळूण येथे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली तर पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतही अशाच प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *