वर्षा गायकवाड यांचा सवाल, सीडीआर खाजगी व्यक्तीला कसा मिळाला खरात प्रकरणातील महिलांचे व्हिडीओ सार्वजनिक होणे अत्यंत गंभीर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. राज्यात आधीच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. अशोक खरात प्रकरणात स्थानिक पोलीसांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सार्वजनिक होणे आक्षेपार्ह असून VDO सार्वजिन करणाऱ्यांवर पोलीस वा सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अशोक खरातने अंधश्रद्धेचा बाजार मांडून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरु होता. पण त्याची भनक स्थानिक पोलिसांना कशी लागली नाही, राज्याच्या गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे. हे प्रकरण बाहेर काढल्याचा मुख्यमंत्री आता मोठा दावा करत असले तरी एवढे वर्ष ते काय करत होते. त्यांच्या गृहविभागाला याची काहीच माहिती कशी नव्हती, या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावा लागतील. या प्रकरणात फक्त महिलांच्या लैंगिक शोषणाचाच प्रकार नसून त्यात अनेक राजकीय नेते व मंत्री यांचे खरातशी संबंध असल्याचे उघड झाले. सरकार त्यांची चौकशी का करत नाही असा सवाल करत देवेंद्र फडणवीस हे स्वतःची खूर्ची वाचवण्यासाठी आपल्या पक्षातील व मित्रपक्षातील खरातशी संबंधित मंत्री व नेत्यांची चौकशी करत नाहीत का, असा सवाल यावेळी केला.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, अशोक खरातशी कोणते मंत्री व नेते किती वेळ बोलले याचा सीडीआर बाहेर आला आहे. हा सीडीआर खाजगी व्यक्तीला कसा काय मिळाला व त्यातील काही लोकांचीच नावे कशी काय जाहीर केली, यामागे राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रकार दिसत आहे. सीडीआर बाहेर कसा आला त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे असेही यावेळी म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, उपाध्यक्ष अखिलेश यादव, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर, राजपती यादव, नगरसेविका अजंता यादव, अर्शद आझमी इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते.

एसआयआरविषयी मुंबई काँग्रेसची बैठक..

निवडणूक आयोगाकडून विशेष पुनरीक्षण मोहिम (SIR) सुरु करण्यात येणार आहे. याविषयी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन येथे पार पडली. एसआयआर बद्दल यावेळी चर्चा करण्यात आली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *