विजय वडेट्टीवार यांची टीका, मुख्यमंत्री कितीही खोट बोलत असले तरी…हेच सत्य वाशिम जिल्ह्यांत इंधन टंचाई आहे हे सत्य

मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, जर ऐन हंगामात मशागतीची कामं झाली नाहीत, तर पेरण्या वेळेवर होणार नाहीत. पेरण्या लांबल्या तर थेट उत्पादनावर परिणाम होईल. याचा अंतिम फटका संपूर्ण राज्याला आणि देशाला बसेल, बाजारात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण होईल आणि महागाई गगनाला भिडेल. आज शेतकरी डिझेलसाठी वणवण भटकतोय, उद्या सामान्य जनतेला अन्नधान्यासाठी वणवण भटकावे लागेल अशा इशाराही यावेळी दिला

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेच्या धुंदीत राहून वस्तुस्थिती नाकारणं बंद करा. शेतकऱ्यांचे हाल थांबवा आणि तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करा. अन्यथा, टंचाईमुळे उद्भवणाऱ्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा! असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार, पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको - बँकांना निर्देश

राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *