भाजपा नेते शहजाद पूनावाला यांचा मोदींच्या समर्थनार्थ व्हिडिओ, पंतप्रधान मोदी मुळे निराश पंतप्रधान मोदी हुकूमशाह बनण्यात अपयशी

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकाकारांवर निशाणा साधला. पंतप्रधान हुकूमशहा बनण्यात ‘अपयशी’ ठरले आहेत. तसेच, अलीकडील नीट (NEET) आंदोलनाच्या वादावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिसादाची तुलना त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यांमधील असंतोष हाताळण्याच्या कामगिरीशी केली.

‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहजाद पूनावाला म्हणाले की, ते पंतप्रधान मोदींमुळे ‘पूर्णपणे निराश’ झाले आहेत. त्यांनी उपहासाने पुढे म्हटले, “बारा वर्षे उलटून गेली, आणि ते अपयशी ठरले आहेत. एक योग्य हुकूमशहा कसे बनायचे हे देखील त्यांना माहीत नाही.
दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या नीट आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईविरुद्ध कथितपणे अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ संदेश पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही टिप्पणी आली आहे.

पुढे आपल्या व्हिडीओ म्हणध्ये शहजाद पूनावाला म्हणाले की, हुकूमशहासारखे वागण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी समाज, पोलीस आणि इतर सर्वांना विद्यार्थ्यांना माफ करण्याचे आवाहन केले.

शहजाद पूनावाला म्हणाले की, काल रात्री त्यांनी (पंतप्रधान मोदी) एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि ज्या मुलांनी घटनात्मक अधिकारी आणि त्यांच्या दिवंगत आईविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली, ‘ती खोडकर मुले आहेत, त्यांना माफ करा.’ त्यांनी समाज, पोलीस आणि सर्वांना त्यांना माफ करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर भाजपा नेते शहजात पूनावाला यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले, राहुल गांधी हे इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे वंशज आहेत. खरी हुकूमशाही काय असते, खरी आणीबाणी काय असते, हे त्यांच्याकडून शिका, मोदीजी असे आवाहनही केले.

शहजाद पूनावाला यांनी असा आरोप केला की, एकीकडे मोदी सरकारने विद्यार्थी आंदोलकांच्या मागण्या मान्य करून त्यांच्यावरील खटले मागे घेतले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस सरकारे सोशल मीडियावरील पोस्ट आणि आंदोलनांवरून खटले दाखल करत आहेत.

अलीकडील घटनांचा संदर्भ देत शहजाद पूनावाला यांनी दावा केला की, केरळमध्ये इंस्टाग्राम वापरकर्त्यांवर राहुल गांधी यांचा कथित अपमान केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी कर्नाटकात एका पोस्टरवरून आणि एका रॅप कलाकाराविरुद्ध झालेल्या पोलीस कारवाईचाही उल्लेख केला.

शहजाद पुनवाला यांनी पुढे काँग्रेसच्या राजकीय इतिहासाचा संदर्भ देत असा आरोप केला की, जवाहरलाल नेहरूंनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली होती आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले व असंतोष दडपला.

शहजाद पूनावाला यांनी आसाम आंदोलन, नवनिर्माण आंदोलन आणि अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचाही उल्लेख केला आणि असा आरोप केला की, त्या काळात हजारो आंदोलकांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

पुन्हा पंतप्रधान मोदींना उद्देशून शहजाद पूनावाला म्हणाले, आज मुले अपशब्द वापरत आहेत आणि तुम्ही म्हणत आहात, ‘ती लहान मुले आहेत, चुका होतात. आपण त्यांना योग्य मार्गावर आणायला मदत केली पाहिजे.’ पण राहुलजी, खऱ्या हुकूमशहाप्रमाणे, एका इन्स्टाग्राम पोस्टवरून खटले दाखल करून घेत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या टीकाकारांवर उद्देशून शहजाद पूनावाला यांनी आणखी एक टोला लगावत आपले भाषण संपवताना म्हणाले की, मोदीजी, १२ वर्षे झाली. तुम्ही हुकूमशहा बनू शकलेले नाही. तुम्ही या सर्व डाव्या उदारमतवाद्यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. तुम्ही अपयशी ठरला आहात अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

शुक्रवारी रात्री उशिरा एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, नीट (NEET) आंदोलनादरम्यान त्यांच्या दिवंगत आईलाही ‘अशोभनीय शिवीगाळ’ सहन करावी लागली होती, याचे त्यांना दुःख झाले, परंतु त्यांनी समाजाला विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्याचे आवाहन केले.
त्यांना ‘गैरमार्गावर गेलेली मुले’ संबोधून, पंतप्रधान मोदी यांनी लोकांना त्यांना माफ करण्याचे आणि ‘आपल्या चुकांमधून शिकण्यास’ मदत करण्याचे आवाहन केले.

“ही मुले आपली आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले आणि पुढे म्हणाले की, त्यांना न्यायालयात खेचल्याने किंवा सार्वजनिकरित्या अपमानित केल्याने ही समस्या सुटणार नाही.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारने आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखालील ३६ दिवसांचे आंदोलन संपल्याच्या काही दिवसांनंतर ही वक्तव्ये आली आहेत.

नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. या पक्षांच्या अनेक नेत्यांनी आंदोलकांवरील पोलीस कारवाईवरून मोदी सरकार ‘हुकूमशाही’ पद्धतीने वागत असल्याचा वारंवार आरोप केला होता.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी आंदोलन हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीवर टीका करताना ‘हुकूमशहा’ हा शब्द वापरला होता.

शहजाद पूनावाला यांचे शनिवारी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर होते.

About Editor

Check Also

जम्मू आणि काश्मिरातील कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून गोळीबार मृत मजूराच्या भावाने दिली माहिती

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या छत्तीसगडच्या एका मजुराच्या कुटुंबीयांनी आरोप केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *