राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री ११ वाजता आंदोलन; मोदी सरकार व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेटीसाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री रास्ता रोको आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रात्री सुमारे ११ वाजता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे रिक्लेमेशन येथे रास्ता रोको करत वाहतूक रोखली. यावेळी मोदी सरकार तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसने आपला निषेध नोंदवला. या आंदोलनाला मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस तेजस चंदूरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रज्ञा ढवळे, अजय मिश्रा, शादाब अन्सारी, शिवा यादव, अब्दुल समद, पंकज चौधरी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजप सरकारे व्होट चोरी करून आलेली आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. या व्होटचोरीविरोधात देशभरात संताप आहे. या जनभावनेला अनुसरून राहुल गांधी हे ३०० खासदारांसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना भेटायला जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ही मोदी सरकारची दडपशाही आहे, आम्ही याचा निषेध करतो. मोदी सरकार जेव्हा जेव्हा राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल त्या प्रत्येकवेळी राहुलजींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून संघर्ष करू असे शबरीन म्हणाल्या.

दरम्यान, मुंबईतील आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी महिला युवक काँग्रेस कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की व मारहाण केली तसेच काही महिला कार्यकर्त्यांना केसाला धरून ओढत पोलिस व्हॅनमध्ये फेकले. पोलिसांच्या या दडपशाहीचा मुंबई युवक काँग्रेसने निषेध केला आहे.

About Editor

Check Also

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजपा सरकार घाबरले, आंदोलनाला परवानगी नाकारली टिळक भवनमधून आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांना घेतले ताब्यात

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.भाजपा सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *