चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, गोशाळांच्या जमिनीचे व्यवहार आता कृषी दरानेच गोशाळेसाठी जमीन खरेदी, दानपत्र, भाडेकरार करताना यापुढे व्यावसायिक दरावर बंदी

गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरार करताना आता कृषी दर लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले.

गोशाळेतून सेवाभाव जपला जातो असे सांगून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भटक्या, आजारी, वृद्ध, अपघातग्रस्त गोवंशाचे संगोपन होते. देशी गोवंशाच्या जतनासह चारा लागवड होत असल्याने गोशाळा व्यावसायिक दरातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्पष्टता नसल्याने जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरारावेळी या संस्थांना व्यावसायिक कंपनी समजून निवासी किंवा औद्योगिक दराने मूल्यांकन केले जात होते.

अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील ‘वर्धमान गोतिर्थ’ संस्थेच्या जमीन खरेदीच्यानिमित्ताने ही बाब समोर आली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्र्यांकडे निवेदन दिले होते.

गोशाळांसाठी २५ लाखांचे अनुदान

गोशाळांना चारा लागवड व जनावरांच्या संगोपनाचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि शाश्वत व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकृत गोशाळांना २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि कॅबिनेट उपसमिती राज्यातील प्रत्येक गोशाळा मजबूत करण्यासाठी कार्यरत असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

जात वैधतेच्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आवाहन राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्जदार लॉगीनद्वारे ऑनलाइन त्रुटींची पूर्तता करावी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *