Editor

माधुरी मिसाळ यांचे आश्वासन, अग्निसुरक्षा परवानगीची चौकशीत दोषी आढळल्यास विकासकावर कारवाई जोगेश्वरीतील प्रकरणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

मुंबईतील जोगेश्वरी येथील मे.ज्ञानप्रकाश शुक्ला डेव्हलपर्स एलएलपी या बांधकाम प्रकल्पाला देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा परवानगीबाबत उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर तपासणीचे आदेश देण्यात आले असून, दोषी आढळल्यास संबंधित विकासकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, तेल-वायु कोणाकडून खरेदी करायची याची परवानगी अमेरिका का देतेय? पुरवणी मागण्यावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला सवाल

अनुदान पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना सरकारवर टीका केली आणि विचारले की, भारत कोणाकडून तेल आणि वायू खरेदी करायचा हे ठरवण्याची परवानगी अमेरिका का देत आहे? राहुल गांधी पुढे म्हणाले की,“… वेगवेगळ्या तेल पुरवठादारांशी असलेले आपले संबंध आपण ठरवू शकतो का, हेच बिघडले आहे. आणि …

Read More »

ओम बिर्ला यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, विरोधी पक्षनेता सभागृहाच्या वर नाही लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव जिंकल्यावर केली टीका

विरोधी पक्षाचा अविश्वास ठराव सभागृहात पराभूत झाल्यानंतर गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा काम सुरू करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपली कृती निःपक्षपाती असल्याचे सांगत आपल्या पहिल्याच भाषणात ओम बिर्ला म्हणाले की, प्रत्येक खासदाराला लोकसभेत बोलता यावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, तसेच विरोधी पक्षनेता “सदनाच्या वर” नसल्याचे स्पष्ट करत …

Read More »

आकाश फुंडकर यांचे निर्देश, संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या टेक्नो क्राफ्ट इंडस्ट्रीजच्या गारमेंट विभागातील संपाबाबत सूचना

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. मंत्री उदय सामंत म्हणाले, उंच इमारतींमध्ये आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० …

Read More »

जम्मू आणि काश्मीर प्रश्नी माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर खूनी हल्ल्याचा प्रयत्न पाठीमागून येऊन फारूख अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, वय वर्षे ८८, यांनी गुरुवारी (१२ मार्च २०२६) सांगितले की, आजच्या भारतात द्वेष खोलवर रुजला आहे, कारण फारूख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी (११ मार्च) रात्री जम्मूमध्ये एका लग्न समारंभात स्थानिक रहिवाशाने केलेल्या अयशस्वी हत्येच्या प्रयत्नाची “सखोल चौकशी” करण्याची …

Read More »

मुंबईतील विधानभवनासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी विधानभवन केले रिकामे, प्रशासनात खळबळ

आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेरिका आणि इस्रायलने इराण देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर होत आहे. त्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच संसदेचे आणि महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. मात्र या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सगळी कडेकोट सुरक्षा असताना मुंबईतील विधानभवनासाह सार्वजनिक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ची महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार

राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून उभे राहत असल्याचे सांगून पुढील काही वर्षांत महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र जगभरात एक नव्हे तर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची इंधन तुटवड्यावरून केंद्र सरकारवर टीका पेट्रोलियम क्षेत्रात एस्मा ESMA लागू

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात केंद्र सरकारने एस्मा ESMA लागू केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या ऊर्जा धोरणावर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारने अचानक एस्मा ESMA लागू केल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले. प्रकाश …

Read More »