सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची होणारी बदनामी आणि सायबर छळवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नउत्तरांच्या तासात सांगितले. विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील सायबर सुरक्षेबाबत प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’
बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संदीप शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष …
Read More »७.५ एचपी वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही केवळ ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून वीज वापर ७.५ हॉर्सपॉवरच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कृषी पंपधारक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपासून …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, विकासाकडे जाताना महाराष्ट्राचे वास्तव काय? ५.५० लाख कोटींवर असलेले कर्ज आता ११ लाख कोटींवर पोहोचले
अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना अर्थमंत्री इथे बसले पाहिजे. मी तासंतास चर्चेमध्ये बसायचो. अधिकारी या सरकारला जुमानत नाहीत, मुख्यमंत्री हे का चालवून घेतात याचा तपास करायला पाहिजे. या वर्षीचा अर्थसंकल्प एकदम उत्तम दिवशी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार असलेल्या जयंतीदिनी मांडला गेला पण पण त्याहून देखील महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण अर्थसंकल्पीय …
Read More »सुनेत्रा अजित पवार यांची घोषणा, महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी सवलतीची घोषणा
मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही यावेळी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या …
Read More »काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस मुख्यालयावर मोर्चा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयासमोर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी मुंबईतील फोर्ट परिसरातील ठाकरसी हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत २३ मार्च रोजी नागपूर येथे …
Read More »इराणच्या विरोधातील संघर्षामुळे कच्चा तेलाच्या प्रति बॅरलची किंमत ११० डॉलर्सपेक्षा जास्त परिणामतः घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात संघर्षामुळे तेलाच्या बाजारपेठेत गोंधळ निर्माण झाला आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत. वाढत्या संघर्षावर व्यापाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मध्य पूर्वेकडून होणारी …
Read More »विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती
शिष्यवृत्तीधारक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल करू नये, यासाठी राज्य सरकार लवकरच शासन निर्णय निर्गमित करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात आमदार योगेश सागर यांनी राज्यातील शासकीय व मान्यता प्राप्त वैद्यकीय मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील मुलींना शिक्षण …
Read More »आशिष शेलार यांचे आश्वासन, राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींच्या परीक्षा शुल्कासंदर्भात समिती मार्फत निर्णय अन्य राज्ये व केंद्र शासनाच्या प्रक्रियेचा समितीमार्फत अभ्यास करून निर्णय घेणार
राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. तसेच अन्य राज्यातील तसेच केंद्र शासनाच्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा समितीमार्फत अभ्यास करून शुल्क सवलतीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री …
Read More »माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार
मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला. राज्यमंत्री माधुरी …
Read More »
Marathi e-Batmya