जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘ जावे विनोदाच्या …
Read More »विमान अपघात प्रकरणी राज ठाकरे म्हणाले, एफआय़आरला सरकार का घाबरतंय रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती दिली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतर या अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषदत घेत वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. तसेच मुंबई पुणे येथील पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी एफआयआर घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यातच …
Read More »राज ठाकरे यांना भेटल्यानंतर रोहित पवार म्हणाले, अपघातानंतर एफआयआर का घेतला नाही हाच प्रश्न अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, या अपघातामागे घातापात असल्याचे कर्जत जामखेडचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास तीन दिन झाले, रोहित पवार हे यांनी सुरुवातीला मंत्रायाच्या जवळील मरिन लाईन्स पोलिस स्टेशन आणि …
Read More »मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे “जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन
महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी “जावे विनोदाच्या गावा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित “लोकसेवेचा लोकजागर” या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. …
Read More »उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड प्रफुल पटेल यांचा प्रस्ताव तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे अनुमोदन
तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज वरळी येथील डोम येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची शिफारस केली, त्यास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे …
Read More »एकनाथ शिंदे यांची घोषणा, महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती.. महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही
राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती
पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी केली असता प्रारंभी कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता. मात्र लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर काही दिवसांपूर्वी ‘ब्लिंकइट’च्या माध्यमातून कालबाह्य अन्न वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीवर …
Read More »योगेश कदम यांची माहिती, पोलीस कोठडीतील आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ससून रूग्णालयात पोलिस चौकीची स्थापना
पाचगणी पोलीस स्टेशन येथे पोक्सो अन्वये दाखल गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच कर्तव्यात केलेल्या कसुरीबाबत त्यांच्यावर खातेनिहाय विभागीय चौकशीची कारवाई करण्यात आलेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत ससून रुग्णालय पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली असल्याचे गृह …
Read More »मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात आश्वासन
विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ १५ महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार …
Read More »काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी उद्यापासून चिपळूणमध्ये ३ दिवसीय निवासी शिबिर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह ज्येष्ठ नेते व विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आहे. चिपळूणमधील या शिबिराला काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya